पुणे : धावत्या कारमध्ये महिला वकिलावर लैंगिक अत्याचार, भयंकर प्रकरण

ओमकार वाबळे

Pune Crime : पुणे शहारातील पॉश परिसरातील एका वकील महिलेचे धावत्या कारमध्ये लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोप असा करण्यात आला की, रविवारी महिलेसोबत रात्री अश्लील कृत्य करण्यात आले होते. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एका आरोपीचा तपास सूरू ठेवला आहे.

ADVERTISEMENT

Pune crime
Pune crime
google news

बातम्या हायलाइट

point

कारमधील आरोपीने तरूणीशी केले अश्लील कृत्य 

point

शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात रात्री काय घडलं?

Pune Crime : पुणे शहरात एका महिला वकिलाचे धावत्या कारमध्ये लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोप असा की, रविवारी रात्री कारमध्ये महिलेसोबत अश्लील कृत्य करण्यात आले होते. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एका आरोपीचा तपास सूरू करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस पुढील प्रकरणाचा तपास करत आहे. 

हे ही वाचा : कामावरुन घरी पोहोचला, बायको घरात यूट्यूबरसोबत दिसली अन् भयंकर कांड!

नेमकं त्या रात्री काय घडलं? 

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरूणी मूळची बिहारच्या पाटणा येथील रहिवासी आहे. पुण्यात ती वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी आली होती, ती सध्या मुंबईतील हायकोर्टमध्ये वकिलीचं काम करते. रविवारी रात्री ती तरूणी कोरेगाव पार्क येथील एका फाइव्ह स्टारमध्ये होती, तिथे तिने मॅट्रोमोनियल या वेबसाईवरून एका व्यक्तीला भेटण्यासाठी बोलावले होते.

वृत्तमाध्यमानुसार, हॉटेलमध्ये एक व्यक्ती दोन महिलांसोबत पोहोचला होता. हॉटेलमध्ये त्यांच्यात एकमेकांशी बोलणं, भेटीगाठी झाल्या. संबंधित तरुणी ही हॉटेलमध्ये दारू पित होती, तिची ओळख शेजारील टेबलवर बसलेल्या एका तरूणाशी झाली. बोलत असताना त्यांनी दुसऱ्या पबमध्ये जाण्याचा प्लान आखला. 

कारमधील आरोपीने तरूणीशी केले अश्लील कृत्य 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व लोक एका कारमधून बंड गार्डन परिसरात पबजवळ आले होते. याचदरम्यान, कारमध्ये बसलेल्या आरोपीने महिलेशी अश्लील कृत्य केलं. आरोपी असा की, प्रवासादरम्यान आरोपींनी दोन मित्रांना फोन लावून महिलेशी अश्लील वक्तव्य केले. कारमध्ये बसलेल्या इतरांनी देखील अश्लील वक्तव्य केली होती. 

हे वाचलं का?