रत्नागिरी : जीवनाचा आनंद महागात, नदीच्या डोहात बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई तक

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मनाला सून्न करून टाकणारी घटना घडली आहे. पोहायला गेलेल्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही मन हेलावून टाकणारी घटना 18 मे 2026 रोजी सोमवारी घडली.

ADVERTISEMENT

Ratnagiri News
Ratnagiri News
google news

बातम्या हायलाइट

point

नदीत पोहताना तिघांचा दुर्दैवी अंत 

point

रत्नागिरी खेड तालुक्यात काय घडलं?

Ratnagiri News : गोकुळ कांबळे - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मनाला सून्न करून टाकणारी घटना घडली आहे. पोहायला गेलेल्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही मन हेलावून टाकणारी घटना 18 मे 2026 रोजी सोमवारी घडली. या घटनेत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसह गुहाघर तालुक्यातील इतर दोघांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनं परिसरात एकच हळहळ उडाली. 

हे ही वाचा : "हाडांपर्यंत जखम, डाव्या कानातून रक्त..'', लग्नात 1 कोटी खर्चून सूनेला हुंड्याची मागणी

नदीत पोहताना तिघांचा दुर्दैवी अंत 

घडलेल्या घटनेनुसार, मृतांची ओळख लावण्या विजय पार्टे (वय 15), नितीन सूर्यकांत जाधव (वय 38) आणि विराज किशोर जाधव (वय 12) अशी मृतांची ओळख समोर आली. सोमवारी 18 मे 2026 रोजी दुपारी तिघेजण पोहण्याचा आनंद घेण्यासाठी नागझरी नदीच्या डोहात पोहण्यासाठी गेली होते, मात्र पुन्हा परतलेच नाहीत. 

नदीचे पात्र आणि त्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. नदी ज्या प्रवाहाच्या दिशेने वाहते, त्याचा अंदाज न आल्याने तिघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी असलेल्या लोकांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी स्थानिकांना या घटनेची माहिती देत मदकार्य सुरू केले, मात्र तोवर खूपच उशीर झाला होता. या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

हे ही वाचा : नराधम बापाकडून दोन अल्पवयीन लेकींचा विनयभंग, बायकोला...

पोलिसांनी पंचनामा केला असता, अरुण गोपाळ पार्टे यांना खेड पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी तिघांचा अकस्मात मृत्यू 37/2026 प्रमाणे बीएनएस कलम 194 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली. या प्रकरणाचा खेड पोलीस पुढील तपास करत आहेत. या मन हेलावणाऱ्या घटनेनं धामणंद, साखर चौकीचीवाडी आणि गिमवी परिसरात नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे. 
 

हे वाचलं का?