नराधम बापाकडून दोन अल्पवयीन लेकींचा विनयभंग, बायकोला...

मुंबई तक

Crime News : वडील-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वडिलांनीच आपल्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणा पीडित मुलींच्या आईने म्हणजे त्या व्यक्तीच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

नराधम बापाचा अल्पवयीन मुलींवर विनयभंग 

point

बऱ्याच काळापासून मोठ्या मुलीचा शारीरिक छळ

point

पत्नीला देखील मारहाण

Crime News : उत्तराखंडच्या हरिद्वार येथील पाथरी पोलीस ठाणे परिसरात वडील-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वडिलांनीच आपल्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणा पीडित मुलींच्या आईने म्हणजे त्या व्यक्तीच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. दरम्यान, या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेत अटक करण्यात आली. नंतर त्याला न्यायालयात दाखल करून तुरूंगात पाठवण्यात येणार आहे. 

हे ही वाचा : तरूण लिव्ह-इन पार्टनरचा मृतदेह घेऊन आला, रात्री स्मशानभूमीत..

नराधम बापाचा अल्पवयीन मुलींवर विनयभंग 

पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस ठाणे परिसरातील एका गावानजीकच्या पोलीस ठाण्यात महिलेनं गुन्हा दाखल केला होता. नंतर तिच्या नवऱ्याने तिला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. तिने असा आरोप केला की, त्याने तिच्या थोरल्या मुलीवर (वय 15) लैंगिक अत्याचार केले. नंतर तिच्या लहान मुलीचा (वय 14) विनयभंग केला होता, नंतर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा आरोप केला. 

या प्रकरणी असाही आरोप करण्यात आला की, जेव्हा तिने विरोध केला असता,तिने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. हे प्रकरण समजताच, पोलिसांना तात्काळपणे कारवाई करत पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून एफआरआय नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पीडितांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. 

हे ही वाचा : पुणे : धावत्या कारमध्ये महिला वकिलावर लैंगिक अत्याचार, भयंकर प्रकरण

बऱ्याच काळापासून मोठ्या मुलीचा शारीरिक छळ

संबंधित प्रकरणात महिलेचा असा आरोप की, तिचा पती हा बऱ्याच काळापासून तिच्या मोठ्या मुलीचा शारीरिक छळ करत होता. तिच्या लहान मुलीचा देखील त्याने विनयभंग केला आणि लैंगिक अत्याचाराचा देखील प्रयत्न केला. त्यांनी या कृत्याला अनेकदा विरोध केला, तेव्हा तो तिला आणि पत्नीला देखील मारहाण करायचा. स्टेशन हाऊस ऑफिसर रवींद्र कुमार यांनी सांगितलं की, आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली. तसेच आरोपीला न्यायालयात हजर केले, नंतर तिथून तुरूंगात पाठवले. 

हे वाचलं का?