Gold Rate: आज अचानक प्रचंड स्वस्त झालं सोनं... काय आहे सोन्याचा आजचा भाव?

मुंबई तक

ADVERTISEMENT

काय आहे सोन्याचा आजचा भाव?
काय आहे सोन्याचा आजचा भाव?
social share
google news

Today Gold-Silver Rate: मुंबई: गेल्या काही दिवसांतील विक्रमी वाढीनंतर सोन्याचा भाव 73 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर गेला होता, मात्र शुक्रवारपासून सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तीन दिवसांत सोन्याची किंमत 70451 पर्यंत खाली आली आहे. म्हणजेच सोन्याचे दर (Gold Rates) जवळजवळ तीन हजार रुपयांनी कमी झाले आहेत. एवढेच नाही तर चांदीच्या दरातही (Silver Price) मोठी घसरण झाली आहे. (today gold rate mumbai gold suddenly became so cheap today prices have been falling continuously for three days know the latest rate)

लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदी (Gold-Silver Rates) खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्यासोबतच एमसीएक्सवर चांदीची किंमत तीन दिवसांत 80 हजार रुपयांच्या खाली आली आहे. आज चांदीचा दर हा 1000 रुपयांनी घसरला आहे. शुक्रवारी म्हणजेच 19 एप्रिल रोजी चांदीचा दर 83,507 रुपये प्रति किलो होता. जो तीन दिवसांत 3926 रुपये प्रति किलोने घसरून 79581 रुपयांवर आला आहे.

हे ही वाचा>> LPG Price : निवडणूक येताच दिलासा! LPG सिलिंडर स्वस्त, दरात किती रुपयांची कपात?

सोन्याचे दर किती कमी झाले?

शुक्रवारी एमसीएक्सवर सोन्याची किंमत 72806 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी ​झाली. सोमवारी सोन्याचा भाव 1,300 रुपयांनी घसरून 71,522 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. आज सोन्याचा भाव 746 रुपयांनी घसरून 70451 रुपये एवढा आहे. अशा स्थितीत तीन दिवसांत सोन्याचा दर 2355 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जागतिक बाजारात सोन्याच्या दरात किती घसरण?

जागतिक बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास, शुक्रवारी झालेल्या मोठ्या उलथापालथीदरम्यान, अमेरिकन बाजारात सोने 2% ने घसरून डॉलर 2,341.9 प्रति औंस झाले, जी एका वर्षातील सर्वात मोठी दैनिक घसरण आहे. सोमवारी सोन्याचा दर 2370 डॉलर प्रति औंस होता, तो आज प्रति औंस 2306 डॉलरवर आला आहे.

हे ही वाचा>> Gold Price : सोन्याचे भाव अचानक इतके का वाढले? नेमकं काय घडलं?

सोन्या-चांदीच्या भावात का घसरण?

फेडरल रिझर्व्हकडून दर कपातीची शक्यता कमी झाल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली होती. यासोबतच इराण-इस्रायल युद्धाच्या वाढत्या भीतीमुळे सोने आणि चांदीचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले होते. मात्र, आता इराण-इस्रायल युद्धाची भीती कमी झाल्याने सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT