LPG Price : निवडणूक येताच दिलासा! LPG सिलिंडर स्वस्त, दरात किती रुपयांची कपात?

मुंबई तक

ADVERTISEMENT

19 किलो एलपीजी सिलिंडरचे दर किती रुपयांनी कमी करण्यात आले आहेत?
व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरची किंमती किती रुपयांनी झाली कमी?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

19 किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात

point

तेल वितरण कंपन्यांचा निर्णय

point

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दिलासा

LPG Gas Price news in Marathi : नवीन आर्थिक वर्ष आजपासून सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी गॅसच्या दरात मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे, तर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कायम आहेत.

ADVERTISEMENT

देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुका होत आहेत आणि त्याआधी एलपीजीच्या किंमतीत (LPG Price Cut) मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ एप्रिल रोजी तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली आहे.

व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरवर ही कपात करण्यात आली आहे. 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 32 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत.

हे वाचलं का?

दिल्ली ते मुंबई किती स्वस्त झाले सिलिंडर

तेल विपणन कंपन्यांनी नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. 

दर कपात केल्यानंतर किंमतीत घट झाली आहे. आता राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 30.50 रुपयांनी कमी होऊन 1764.50 रुपये झाली आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> 'वंचित'ची दुसरी यादी जाहीर, मविआला बसणार झटका?

कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 32 रुपयांनी कमी झाली असून आता तो येथे 1879 रुपयांना मिळणार आहे. 

ADVERTISEMENT

मुंबईतील एलपीजीच्या किंमतीबद्दल सांगायचे झाले तर येथे सिलिंडरची किंमत 31.50 रुपयांनी कमी होऊन 1717.50 रुपये झाली आहे, तर चेन्नईमध्ये 30.50 रुपयांनी कमी होऊन 1930 रुपये झाली आहे.

हेही वाचा >> ''शिंदेंनी सोलापूरमधील 12 अतिरेक्यांना वाचवलं'', राम सातपुतेंच्या आरोपाने खळबळ

IOCL च्या वेबसाइटनुसार, हे बदललेले दर 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी 1 मार्च रोजी 19 किलोचा एलपीजी सिलिंडर दिल्लीत 1795 रुपये, कोलकात्यात 1911 रुपये, मुंबईत 1749 रुपये आणि चेन्नईमध्ये 1960.50 रुपयांना मिळत होता.

महिला दिनी घरगुती सिलिंडरमध्ये झाली होती कपात

यापूर्वी महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरवर ग्राहकांना मोठा दिलासा दिला होता. 

यानंतर घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी करण्यात आली. सध्या या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही आणि एका सिलिंडरची किंमत दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे.

आता इतर मोठ्या शहरांमध्ये इतकी आहे किंमत

दिल्ली ते चेन्नई या चार महानगरांव्यतिरिक्त इतर शहरांबद्दल बोलायचे झाले तर लखनौमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1877.50 रुपये, जयपूरमध्ये 1786.50 रुपये, गुरुग्राममध्ये 1770 रुपये आणि पटनामध्ये 2039 रुपये झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT