‘इंडिक टेल्स’वर बंदी घाला; छगन भुजबळ यांची देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Maharashtra News : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सावरकर जयंतीदिनी सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे हटवण्यात आल्याच्या मुद्द्यावरील वाद ताजा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आणखी एका प्रकरणाकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधलं आहे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

हेही वाचा >> Gautami Patil : ‘पाटील’ आडनाव बदलावं? गौतमीच्या गावातील लोक म्हणतात…

छगन भुजबळ यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “इंडिक टेल्स नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेले आहे. सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल ‘इंडिक टेल्स’ च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> राष्ट्रवादी की काँग्रेस, पुण्यात वरचढ कोण; आकड्यात समजून घ्या कुणाची ताकद जास्त?

“हे अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती-फुले-शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा छगन भुजबळ यांनी तीव्र निषेध केला आहे”, भुजबळांनी पत्रात म्हटलं आहे.

इतिहासाची मोडतोड सुरूये

भुजबळ पुढे म्हणतात, “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे, यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड, धोंडे, शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले.”

ADVERTISEMENT

“या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तींकडून प्रहार केला जात आहे. एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करीत आहे. या पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली अक्षरशः इतिहासाची मोडतोड सुरु आहे”, असा आरोप भुजबळ यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

ही प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता

“ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुलेंच्या बदनामी बाबतचा हा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी”, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT