Cyclone Biparjoy आज धडकणार! 442 गावांना रेड अलर्ट, मुंबईत 5 टीम तैनात
Cyclone Biparjoy to make landfall today : चक्रीवादळामुळे 74 हजार लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर, 442 गावांना सतर्कतेचा इशारा, बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार.
ADVERTISEMENT
Cyclone Biparjoy Latest Updates : बिपरजॉय चक्रीवादळ आज संध्याकाळी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. हे वादळ कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ बंदरावर धडकणार आहे. गुरुवारी (15 जून) संध्याकाळी वादळ जेव्हा किनारपट्टीवर धडकेल तेव्हा त्याचा वेग 125 ते 150 किमी असेल असा अंदाज आहे. चक्रीवादळामुळे मोठी हानी होण्याची शक्यता असून, केंद्र आणि राज्य सरकारसह प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्यासाठी सज्ज आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) उपमहानिरीक्षक (ऑपरेशन्स) मोहसीन शाहिदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत गुजरातच्या किनारपट्टी भागातून 74,००० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. वादळामुळे 8 जिल्ह्यांतील 442 गावांना पूर आणि पावसाचा फटका बसू शकतो, असा अंदाज आहे.
हेही वाचा >> ‘बेडूक कितीही फुगला तरी..’, BJP च्या जिव्हारी लागली जाहिरात; खासदाराने शिंदेंना सुनावलं!
एकट्या कच्छमध्ये सुमारे 34,300 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. यानंतर जामनगरमध्ये 10,000, मोरबीमध्ये 9,243, राजकोटमध्ये 6,089, देवभूमी द्वारकामध्ये 5,035, जुनागढमध्ये 4,604, पोरबंदर जिल्ह्यात 3,469, गीर सोमनाथ जिल्ह्यात 1,605 लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
हे वाचलं का?
गुजरातमध्ये एनडीआरएफच्या 18 तुकड्या मदतकार्यात
चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफने गुजरात आणि महाराष्ट्रात पथके तैनात केली आहेत. गुजरातमध्ये 18 तुकड्या कर्तव्यावर असून, याशिवाय दादरा आणि नगर हवेली तसंच दमण आणि दीव इथंही पथके तैनात असणार आहे. एनडीआरएफच्या 4 तुकड्या गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात, तीन टीम राजकोट आणि तीन टीम द्वारकामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा >> रायगडमध्ये भाजपचे बेरजेचं राजकारण! सुनील तटकरेंविरुद्ध पाटलांना ‘ताकद’?
महाराष्ट्रात एनडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात असणार
गुजरातच्या जामनगरमध्ये दोन, पोरबंदर, जुनागड, गीर सोमनाथ, मोरबी, वलसाड आणि गांधीनगरमध्ये प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. महाराष्ट्राबद्दल सांगायचे झाले तर राज्यात 14 पथके तैनात करण्यात आली आहेत. यापैकी 5 तुकड्या मुंबईत तैनात करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित तुकड्यांना सज्ज अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये सुमारे 35-40 कर्मचारी आहेत. सर्व तुकड्या झाडे आणि पोल कटर, फुगवणाऱ्या बोटी आणि मूलभूत औषधांनी सुसज्ज आहेत.
ADVERTISEMENT
20 फूट उंच लाटा उसळण्याची शक्यता
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 15 जून रोजी अरबी समुद्राच्या ईशान्येकडे बरीच हालचाल होईल. समुद्रात 9 फुटांपासून 20 फुटांपर्यंतच्या वादळी लाटा उसळतील. समुद्रात येणाऱ्या भरती-ओहोटीमुळे किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. धोका केवळ समुद्रातून उसळणाऱ्या लाटा आणि वादळांचाच नाही, तर मुसळधार पावसाचा इशाराही हवामान खात्याने जारी केला आहे. कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, रोजकोट, जुनागड आणि मोरबीमध्ये रेकॉर्डब्रेक पावसाची शक्यता आहे. काही भागात ढगफुटीची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
राज्यापासून केंद्रापर्यंत सर्व यंत्रणा अलर्ट मोडमध्ये
बिपरजॉय वादळाच्या संदर्भात सध्या राज्यापासून केंद्र सरकारपर्यंत सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. केंद्रीय गृहमंत्री, संरक्षण मंत्री, तिन्ही लष्करप्रमुख, एनडीआरएफ, एसडीआरएफ, गुजरातचे मुख्यमंत्री आणि आपत्ती व्यवस्थापन आणि हवामान खात्याशी संबंधित प्रत्येक कर्मचारी, सगळ्यांच्याच नजरा फक्त बिपरजॉय वादळावर आहेत.
हेही वाचा >> लोकप्रियतेचा मुद्दा वगळला, देवेंद्र फडणवीस झळकले! शिवसेनेकडून ‘डॅमेज कंट्रोल’
दवंडी देऊन लोकांना वादळाचा इशारा
गुजरातमधील गावोगावी दवंडी देऊन लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला जात आहे. लोकांना पुढील दोन दिवस घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कच्च्या घरात राहू नका, सुरक्षित ठिकाणी पोहोचा, असेही लोकांना सांगितले जात आहे. बारा दिवसांपूर्वी खेडा गावात आलेल्या वादळात 170 हून अधिक घरांची छत उडाल्याचे सांगण्यात येत आहे.
आकाशवाणीचा टॉवर पाडला…
खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातमधील द्वारका येथील ऑल इंडिया रेडिओचा टॉवर स्वतःहून खाली आणण्यात आला आहे, त्यामुळे ताशी 150 किमी वेगाने वारे वाहत असल्यास हा टॉवर कोसळण्याची भीती होती. वादळामुळे टॉवर कोसळल्यास नुकसान जास्त होईल, त्यामुळे टॉवर आधीच खाली आणण्यात आला.
गुजरात : कोणत्या जिल्ह्यात वारे किती वेगाने वाहतील?
मोरबीमध्ये 125 ते 150 किमी ताशी, जामनगरमध्ये 120 ते 140 किमी ताशी, द्वारकामध्ये 120 ते 145 किमी ताशी, जुनागढमध्ये 100 ते 120 किमी ताशी, पोरबंदरमध्ये 100 ते 120 किमी ताशी, राजकोट ते भानगरमध्ये 100 ते 120 किमी ताशी, राजकोट ते 60 ते 60 किमी ताशी सुरेंद्र नगर येथे ताशी ७० किमी.
VSCS Biparjoy over Northeast Arabian Sea at 0230 hours IST of 15th June, 2023 about 200 km west-southwest of Jakhau Port (Gujarat). To cross Saurashtra & Kutch and adjoining Pakistan coasts between Mandvi and Karachi near Jakhau Port by evening of 15th June as a VSVS. pic.twitter.com/2mnj4zC4sy
— India Meteorological Department (@Indiametdept) June 15, 2023
गुजरातशिवाय या 8 राज्यांनाही आहे धोका
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गुजरात आणि महाराष्ट्रासह 9 राज्यांना वादळाचा धोका आहे. लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि राजस्थान (पश्चिम) ही 9 राज्ये आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT