EPFO : 6.5 कोटी लोकांसाठी खुशखबर! मोदी सरकारने PF व्याज वाढीची केली घोषणा
2021-22 या आर्थिक वर्षासाठी EPFO ने EPF खात्यासाठी 8.10 टक्के व्याजदर निश्चित केला होता. हा जवळपास 40 वर्षांतील सर्वात कमी व्याजदर आहे.
ADVERTISEMENT
EPF Interest rate latest news : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आर्थिक वर्ष 2022-23 साठी PF खात्यासाठी 8.15 टक्के व्याजदर घोषित केला आहे. पूर्वी तो 8.10 टक्के होता. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधीच्या योगदानाच्या व्याज दरात वाढ केल्यास सूचित केले आहे. ईपीएफओने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की कामगार व रोजगार मंत्रालय, भारत सरकारने ईपीएफच्या प्रत्येक सदस्याच्या हितासाठी 1952 तील परिशिष्ट 60 (1) अंतर्गत केंद्र सरकारला मान्यता दिली आहे. (Employees’ Provident Fund Organization (EPFO) has declared the interest rate for EPF account at 8.15 per cent for the financial year 2022-23, earlier it was 8.10 per cent.)
ADVERTISEMENT
EPFO खात्यावरील व्याजदरात वाढ करण्याच्या घोषणेशी संबंधित परिपत्रक सोमवार, 24 जुलै रोजी जारी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या मंडळाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी EPF खात्यावर 8.15 टक्के व्याजदर निश्चित केला होता आणि तो मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवला होता. माहितीनुसार, ऑगस्ट 2023 पासून व्याजाचे पैसे खात्यात पोहोचण्यास सुरुवात होईल.
ईपीएफओ बोर्डाने मार्चमध्ये दिला होता प्रस्ताव
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, बोर्डाने यावर्षी मार्चमध्ये व्याजदर 8.10 टक्क्यांवरून 8.15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता. अहवालानुसार, CBT च्या शिफारशीनंतर, व्याज दर वित्त मंत्रालयाकडून अधिसूचित केले जातात. त्यानंतरच ते EPFO सदस्यांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. सामान्यतः, व्याजदर वित्त मंत्रालयाकडून आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अधिसूचित केला जातो आणि ग्राहक FY23 च्या अधिसूचनेची वाट पाहत होते.
हे वाचलं का?
वाचा >> ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि नवा पायंडा सुरू झाला’, फडणवीसांनी काढला इतिहास
यापूर्वी होता 40 वर्षांतील सर्वात कमी व्याजदर
महत्त्वाचे म्हणजे 2021-22 या आर्थिक वर्षासाठी EPFO ने EPF खात्यासाठी 8.10 टक्के व्याजदर निश्चित केला होता. हा जवळपास 40 वर्षांतील सर्वात कमी व्याजदर आहे. 1977-78 मध्ये EPFO ने 8 टक्के व्याजदर निश्चित केला होता. पण तेव्हापासून ते सतत ८.२५ टक्के किंवा त्याहून अधिक आहे. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 8.65 टक्के, 2017-18 मध्ये 8.55 टक्के, 2016-17 मध्ये 8.65 टक्के आणि 2015-16 या आर्थिक वर्षात 8.8 टक्के व्याज उपलब्ध होते.
वाचा >> ‘रोहित पवारांचं आंदोलन’, अजित पवारांनी टोचले कान, उदय सामंतांची मध्यस्थी यशस्वी
कर्मचार्यांच्या पगारातून कपात
कर्मचाऱ्याच्या पगारावर 12% कपात ईपीएफ खात्यासाठी आहे. कर्मचार्यांच्या पगारातून नियोक्त्याने (कंपनीने) केलेल्या कपातीपैकी 8.33 टक्के रक्कम EPS (कर्मचारी पेन्शन योजना) पर्यंत पोहोचते, तर 3.67 टक्के EPF मध्ये पोहोचते. तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची सध्याची शिल्लक घरबसल्या सोप्या पद्धतीने तपासू शकता. यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. उमंग अॅप, वेबसाइट किंवा तुमच्या मोबाइल फोनवरून एसएमएस पाठवून तुम्ही हे जाणून घेऊ शकता. देशभरात सुमारे 6.5 कोटी EPFO चे ग्राहक आहेत.
ADVERTISEMENT
Afzal Guru ला फाशी देताच जेलर ढसाढसा रडला, कधीही समोर न आलेला ‘हा’ किस्सा जरूर वाचा!
EPFO पोर्टलवरून असे चेक करा बॅलन्स
EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जा (www.epfindia.gov.in).
यानंतर ई-पासबुक या पर्यायावर क्लिक करा.
नवीन पृष्ठावर, UAN, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि लॉगिन वर क्लिक करा.
लॉग इन केल्यानंतर, पासबुक पाहण्यासाठी सदस्य आयडी पर्याय निवडा.
आता तुम्हाला पासबुक पीडीएफ फॉरमॅटमध्ये मिळेल, जे डाउनलोड केले जाऊ शकते.
तुम्ही https://passbook.epfindia.gov.in/ वर जाऊन थेट पासबुक पाहू शकता.
आता संपूर्ण माहिती तुमच्या समोर उघडेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT