Afzal Guru ला फाशी देताच जेलर ढसाढसा रडला, कधीही समोर न आलेला 'हा' किस्सा जरूर वाचा! - Mumbai Tak - what did afzal guru say to ex jailer sunil gupta before hanging who kept crying the whole day - MumbaiTAK
गुन्ह्यांची दुनिया नॉलेज बातम्या

Afzal Guru ला फाशी देताच जेलर ढसाढसा रडला, कधीही समोर न आलेला ‘हा’ किस्सा जरूर वाचा!

दहशतवादी अफझल गुरूला फाशी देताना नेमकं काय-काय घडलं आणि त्यानंतर त्यावेळी तिथे जे जेलर म्हणून कार्यरत होते त्या सुनील गुप्तांनी नेमकं काय केलं वाचा याविषयीचा खास किस्सा..
Read the special story about what actually happened during the execution of terrorist Afzal Guru and what Sunil Gupta, who was working there as a jailer, did after that.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील (Delhi) तिहार जेलमधील (Tihar Jail) वाढती गुन्हेगारी हा सध्या बराच चर्चेचा विषय आहे. याचविषयी तिहार जेलचे माजी जेलर सुनील गुप्ता (Sunil Gupta) यांच्याशी लल्लनटॉपने (lallantop) खास बातचीत केली. याच विशेष मुलाखतीत सुनील गुप्ता यांनी दहशतवादी अफझल गुरू (Afzal Guru) याच्या फाशीविषयी (Hanging)एक अत्यंत रंजक असा किस्सा सांगितला. ज्यामधून सुनील गुप्ता हे एक जेलर (Jailer) असले तरीही ते एक माणूस आहे याची जाणीव आपल्याला करून देतात. त्यांनी सांगितलेला हा किस्सा वाचा जसाचा तसा.. (what did afzal guru say to ex jailer sunil gupta before hanging who kept crying the whole day)

अफझल गुरूला फाशी देताच जेलर सुनील गुप्ता ढसाढसा का रडले?, वाचा तो खास किस्सा

लल्लनटॉपशी बोलताना सुनील गुप्ता म्हणाले ‘अफझल गुरूची जी फाशी होती.. मला माहिती होतं की, फाशीची शिक्षा ही दहा वर्षातून एखाद वेळेस होते. जेव्हा अफझल गुरूला फाशी द्यायची होती तेव्हा मला त्याचं इनचार्ज बनविण्यात आलं होतं. अफझल गुरुने मला आधीही पाहिलं होतं. त्यामुळे तो मला ओळखत होता. अफझल गुरूच्या कुटुंबीयांना आम्ही दोन दिवस आधीच कळवलं होतं की, त्याला आम्ही फाशी देणार आहोत. पण त्यांना त्याबाबतचं पत्र तेव्हा मिळालं नाही. त्यांना ते पत्र हे फाशीनंतरच मिळालं.’

‘अफझल गुरूच्या फाशीबाबत जास्त लोकांना माहित पडू नये अशी आमची इच्छा होती. कारण हा खूप संवेदनशील मामला होता. म्हणून मी जेलमध्ये फाशीच्या आदल्या दिवशी संध्याकाळीच पोहचलो होतो. तर आम्ही आत सगळी तयारी करत होतो. म्हणजे फासावर लटकवण्याचा जो दोरखंड असतो तो पाहावा लागतो. दोरखंड गळ्यात नीट बसतो की नाही या गोष्टी तिथे पाहाव्या लागतात.’

‘मी असं ऐकलं होतं की, अनेकदा फाशी देतात तेव्हा असं होतं की, कैद्याची मान वरच राहते आणि त्याचं धड खाली पडतं. जर वजनदार व्यक्ती असेल तर असं व्हायचं. त्यावेळी असं होतं की, तो कैदी मेला पाहिजे.. मग काहीही होवो.’

‘अफझल गुरूच्या फाशी प्रकरणात मी कायदेशीर सल्लागार होतो तर सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणे झाल्या पाहिजे असा माझा प्रयत्न होता.’

‘एक दिवस आधी जेव्हा आम्ही तयारी करतो होतो.. तेव्हा आम्ही जो काही दोरखंड लावत होतो.. तो दोरखंड तुटत होता. आम्हाला काय करायचं होतं की, जो कैदी असतो त्याच्या वजनच्या दुप्पट वजन हे एका गोणीत भरून तो दोरखंडाला लावून फाशीचा सराव करायचा होता.’

‘तुम्हाला एक सांगतो… फाशीसाठी जे दोरखंड येतात ते बक्सरहून येतात. बक्सरमध्ये हे दोरखंड बनतात. कारण बक्सरमध्ये गंगेच्या किनारी आद्रर्ता असते त्यामुळे त्याचा जो दोरखंड असतो त्याचे धागे हे खूप मजबूत असतात. तिथूनचे हे दोरखंड आले होते. चार वेळा आणि सराव केला. पण प्रत्येकवेळी ते दोरखंड तुटत होते.’

‘मला हे वाटलं की, मी आता सरकारला काय उत्तर देऊ. की, फाशी मला देता आली नाही.. हे कसं सांगू.. मला वाटलं की, माझी नोकरी आता गेली.. पण देवाच्या कृपेने इतर दोरखंड हे चांगले होते. जे सरावात अजिबात तुटले नाही. त्यामुळे तेच नेमकं फाशीच्या वेळी वापरण्याचा निर्णय झाला. आमच्याकडे भरपूर दोरखंड असतात. त्याचा वापर हा फक्त फाशी देण्यासाठी होत नाही.. तर इतर गोष्टींसाठी देखील होतो.’

हे ही वाचा>> पुण्यात खळबळ! आधी पत्नी-पुतण्याला घातल्या गोळ्या, नंतर केली आत्महत्या

‘त्यावेळी एक छोटी अडचण अशी झाली की, आम्हाला कोणी जल्लाद (फाशी देणारा) भेटत नव्हता. जल्लाद असणं गरजेचं असतं. पण तसं तुम्हाला सांगतो की, जल्लादची काही गरज नसते. जर तुम्हाला सांगितलं ना की, फाशी द्या.. तर तुम्ही पण देऊ शकता. जर माझ्यासारखा लॉ ग्रॅज्युएट फाशी देऊ शकतो तर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही देखील फाशी देऊ शकता.’

‘कारण त्यात फार काही मोठं नसतं.. एक फक्त खटका असतो तो तुम्हाला ओढायचा असतो. महत्त्वाचं असतं की, दोरखंड हा फाशी देणाऱ्याच्या गळ्यात नीट बांधावा लागतो. जर दोरखंड नीट बांधला नाही तर फाशी चुकीच्या पद्धतीने दिली जाते. मग त्यात मान वरच राहते आणि धड खाली पडतं..’

‘जल्लाद कोणी नव्हतं.. सगळे अधिकारी होते आणि आमचे शिपाई होते. आमच्या शिपायांना देखील तुम्ही सांगितलं असतं की, फाशी द्या.. तर त्यांनी हसत ते काम केलं असतं. त्यांच्यासाठी हा एक खेळ असतो. हे सगळं पार पडल्यानंतर मी सकाळी अफझल गुरूजवळ गेलो.’

‘अफझल गुरूने जेव्हा मला पाहिलं तेव्हाच त्याला जाणवलं की, काही तरी आता घडणार आहे. तर मला म्हणाला की, सर आज काय फशी वैगरे देणार आहात का? तर मी विचारलं की, तुला कसं कळलं?’

‘तर म्हणाला.. की, ‘एक तर सकाळी-सकाळी तुमचं दर्शन झालं आणि दुसरं म्हणजे काल रात्री मला एकट्याला वेगळ्या बराकीत बंद केलं.’

‘आपल्या कायद्यानुसार.. ज्याला फाशी द्यायची आहे त्या व्यक्तीवर आपल्याला 24 तास पाहारा द्यावा लागतो. त्यावेळीा शिपाई, सीसीटीव्ही या सगळ्या गोष्टी असतात. तर मी म्हटलं.. हो… तुला फाशी दिली जाणार आहे.’

‘मी त्याला म्हटलं की, चहा पिणार का?.. तर म्हणाला की, तुम्ही आला आहात.. तर तुमच्यासोबत मी चहा घेईन. तर त्याने आमच्यासोबत चहा घेतला. चहा प्यायलानंतर तो मला म्हणाला की, सर मी दहशतवादी नाही. जर मी दहशतवादी असतो.. तर मी माझ्या मुलाला डॉक्टर नसतं बनवलं.. त्यावेळी त्याचा मुलगा हा एमबीबीएसचं शिक्षण घेत होता.’

‘हवं तर मी माझ्या मुलाला देखील दहशतवादी बनवलं असतं.. जे त्याने मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय हा.. मी दहशतवादी नाही.. पण मी नेहमी सत्याच्या सोबत राहिलो आहे. आपण माझा रेकॉर्ड तपासा.. मी पीयूसीएलचा मी सक्रीय सदस्य होतो. त्यांच्या कार्यक्रमाला जायचो. मी नेहमी माझ्या देशाला मजबूत करण्यासाठी इथून असत्य, भ्रष्टाचार हटविण्यासाठी मी काम केलं.’

‘मी तर त्याला म्हटलं की, बघ आता सगळी कायदेशीर कारवाई झालेली आहे. मी काय विचारणार आता.. तर मी त्याला विचारलं की, तुला तुझ्या कुटुंबीयांना काही सांगायचं आहे का? तर मी म्हटलं की, तू लिहून दे तुझ्या कुटुंबीयांना…’

‘कारण मला माहिती होतं की, त्याच्या फाशीनंतर दंगली वैगरे होऊ शकतात. तो एवढा चांगला होता की, त्याने सगळं पत्रात लिहून दिलं. त्याने आपल्या पत्नीला जे पत्र लिहिलं त्यात त्याने असं म्हटलं की, जी ईश्वराची इच्छा होती त्यानुसार मी जात आहे. तू मुलाचं शिक्षण पूर्ण कर.. आणि माझ्या वतीने सगळ्यांना अपील कर की, तिकडे शांतता कायम ठेवा.’

हे ही वाचा>> Crime: ‘माझी आई मरून जाईल’, डॉक्टरला घरी बोलवलं अन् तरुणी झाली नग्न; नंतर…

‘त्यानंतर तो मला म्हणाला.. की सर मला तुमच्या डोळ्यात ना.. खूप करुणा दिसते. तर मी म्हटलं की, चांगली बाब आहे.. जर माझ्या डोळ्यात तुला करूणा दिसतेय तर. तर पुढे म्हणाला की, मला तुम्ही जेव्हा फासावर लटकवाल तेव्हा मला तुमच्या डोळ्यात पाहायचं आहे. मी म्हटलं की, जिथवर तो फासावर द्यायच्या ठिकाणी चालत जाशील तिथवर तू माझ्या डोळ्यात पाहू शकतो. पण त्यानंतर तुझा चेहरा काळ्या कपड्याने झाकला जाईल. त्यानंतर तुला फाशी दिली जाईल. तर म्हणाला जोवर कपडा टाकत नाही तोवर मी तुमच्या डोळ्यात पाहीन. मी म्हटलं ठीक आहे.. तुझं म्हणणं मी मानलं.. मला ते अधिकार होते.. तर मी त्याला परवानगी दिली.’

‘त्यानंतर मला म्हणाला.. की सुनीलजी मी तुम्हाला एक गाणं ऐकवू इच्छितो.. जी मला फाशी मिळतेय ती यासाठी दिली जात आहे की, मला नेहमी लोकांचं चांगलं व्हावं असं वाटायचं. तर त्यानंतर त्याने एक जुनं गाणं गाण्यास सुरूवात केली. ते संपूर्ण गाणं त्याने गायलं.’

‘मी आतापर्यंत आठ फाशी पाहिल्या आहेत. यापैकी अनेक जण हे फासावर जाताना रडायचे. अनेक जण म्हणायचे की, मी काही केलं नाही.. मला अडकवलं वैगरे.. मोठ्या-मोठ्या दहशतवाद्यांना पाहिलंय मी असं रडताना.. हा पहिला कैदी मी पाहिला होता की, जो हसताना म्हणत होता की, मला माझ्यासाठी जगायचं नाही, दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे.’

‘त्यानंतर आम्ही त्याला फाशी द्यायच्या ठिकाणी नेलं.. मी बाजूला उभा होतो.. एक न्यायाधीश होते ते देखील तिथेच उभे होते. जेव्हा त्याला तिथवर नेलं तोवर तो माझ्या डोळ्यात पाहत होता. तिथे गेल्यावर त्याला फाशी देण्यात आली. त्याला फाशी दिल्यानंतर दोन तासांनी डॉक्टरांनी तपासलं. त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.’

‘त्यानंतर असं झालं की, याला जेल परिसरातच दफन करण्यात आलं.. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला होता. जसं मोहम्मद मकबूल भट.. जो त्याचा गुरू होता.. त्याला देखील इथेच फाशी देऊन या परिसरात दफन करण्यात आलं होतं. त्याच्याच बाजूला दफन करण्यात आलं.’

‘हे सगळं झाल्यानंतर जेव्हा मी घरी गेलो.. तोवर मी घरी अजिबात सांगितलं नाही की, मला हे काम करायचं आहे म्हणून.. मी जेव्हा घरी गेलो तेव्हा मला राहून-राहून त्याचं म्हणणं आठवत होतं की, तुमच्या डोळ्यात मला प्रचंड करुणा दिसते. मला अनेकदा लोकं बोलायचे ही गोष्ट, पण एक व्यक्ती जो अगदी मरणाच्या उंबरठ्यावर आहे तो कशाला चमचेगिरी करेल ना..’

‘खरं तर जेलर देखील एक माणूसच असतो. ज्याच्याशी तो काही मिनिटं आधी बोलतोय.. तो काही मिनिटानंतर आपल्यासमोर नसेल.. तर माझं मन ना खूप भरून आलं होतं. मी घरी गेलो तेव्हा माझी मुलगी आणि बायको हे घरात होते. मी अक्षरश: त्यांच्या गळ्यात पडून बराच वेळ रडत राहिलो.’

…तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम?