विधवा महिलेसोबत सेटिंग लावली..पोलिसांची वर्दी घालून घरी भेटायला यायचा, एक दिवस झालं मोठं कांड!
Widow Woman Shocking Viral News : मुजफ्फरनगर येथे राहणारा शुभम राणा मेरठ नावाचा व्यक्ती एका विधवा महिलेवर प्रेम करायचा. त्यामुळे तो या विधवा महिलेला भेटण्यासाठी मेरठला गेला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पागलप्रेमी शुभमचा गजब कारनामा

विधवा महिलेच्या सासरच्यांना आला संशय

पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
Widow Woman Shocking Viral News : मुजफ्फरनगर येथे राहणारा शुभम राणा मेरठ नावाचा व्यक्ती एका विधवा महिलेवर प्रेम करायचा. त्यामुळे तो या विधवा महिलेला भेटण्यासाठी मेरठला गेला. ही महिला मेरठच्या इंचोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहते. जेव्हा जेव्हा शुभम महिलेला भेटायला जायचा, तेव्हा तो पोलिसाचा गणवेश घालून यायचा. त्याला वाटायचं की, पोलिसांची खाकी घातल्यावर त्याला कोणी रोखणार नाही. महिलेसोबत भेटायला त्याला काही अडचण होणार नाही. पण याच कारणामुळे तो अडकला आणि पोलिसांच्या हाती लागला.
पागलप्रेमी शुभमचा गजब कारनामा
हे संपूर्ण प्रकरण मेरठच्या इंचोली पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. येथे राहणाऱ्या एका महिलेच्या पतीचं खूप दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर या महिलेची ओळख मुजफ्फरनगरमध्ये राहणाऱ्या शुभम राणाशी झाली. तो महिलेला भेटण्यासाठी तिच्या घरी येऊ लागला. कोणीही संशय घेऊ नये, यासाठी शुभम पोलिसांचा खोटा गणवेश घालायचा.
हे ही वाचा >> Mumbai Train Blast Case : मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल, मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
महिलेच्या सासरच्यांना आला संशय
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम शुक्रवारीही महिलेला भेटायला आला होता. परंतु, यावेळी महिलेच्या सासरच्यांना संशय आला. त्यांनी याबाबत पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी तातडीनं तरुणाला अटक केली. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता, तो बोगस पोलीस असल्याचं उघडकीस आलं. महिलेला भेटण्यासाठीच त्याने पोलिसांचा गणवेश घातल्याचं त्यानं कबूल केलं.
दरम्यान, शुभम ग्रेटर नोएडाचा पोलीस अधिकारी असल्याचा लोकांना सांगायचा. पोलिसांनी त्याच्याकडून खोटं आयडी कार्ड, वर्दी घातलेले फोटो आणि 4 स्टार जप्त केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत एसएसपी मेरठ विपिन ताडाने म्हटलं की, महिलेच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली होती. पोलीस आरोपीला ठाण्यात घेऊन गेले. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.