दोन भावांनी एकाच तरुणीशी केलं लग्न, कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल, नेमकं प्रकरण काय?
Viral Video : एका तरुणीने दोन तरुण भावांसोबत विवाह केला आहे. हे एकूण तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेलच, पण हे वास्तव आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

तरुणीने दोन तरुण भावांसोबत केला विवाह

धक्कादायक कारण आलं समोर
Viral Video : दोन भावांनी एका तरुणीसोबत विवाह केल्याची माहिती समोर आली आहे. हे एकूण तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेलच, पण हे वास्तव आहे. हिमाचलमधील सिरमौर जिल्ह्यातील शिल्लाई भागातील कुन्हट गावातील आहे. दोन भावांसोबत तरुणीने विवाह केला आहे. हे ऐकून कदाचित आपण चक्रावून गेला असाल, पण हे खरं आहे. याचं कारण आता समोर आलं आहे.
हेही वाचा : कर्माचं फळ! भाजप नेते प्रफुल्ल लोढांना हनी ट्रॅप प्रकरणात अटक, तरुणींचे अश्लील फोटो बनवल्याचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
हिमाचल प्रदेशात अनेक वर्षांपूर्वी पत्नी एक आणि पती दोन अशी एक अगळी वेगळी विवाहाची प्रथा होती. ही प्रथा हाटी समाजातील असून याच प्रथेला उजाला असेही म्हटलं जातं. दोन तरुणाशी एका तरुणीने विवाह केल्याने शतकानुशतके जुनी परंपरा पुन्हा एकदा नव्याने समोर आली. याच प्रथेबाबत लखनऊमध्ये एका मुख्यमंत्र्यांनी पीएचडी केली आहे, अशी माहिती आता समोर आली आहे.
दोन भावांनी केलं एकाच तरुणीशी विवाह
एकाच तरुणीशी दोन भावांनी विवाह केला, त्यापैकी एक पती हा परदेशात नोकरी करतो. तर दुसरा हा अणुशक्ती केंद्रात नोकरी करतो. ही ऐतिहासिक प्राचीन परंपरा या लग्नाच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे. हा विवाह हाटी सामाजाच्या उपस्थितीत पार पडला आहे.
एका वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, लग्न समारंभ 3 दिवस सुरू होता. वधू सुनीता चौहान म्हणाली की. तिला या जून्या प्रथेबाबत चांगली माहिती आहे. तरुणी पुढे म्हणाली की, तिनं कोणत्याही दबावाशिवाय लग्नाचा निर्णय घेतला नाही. तिनं सांगितलं की मी नेहमीच या नात्याचा आदर करते.
हेही वाचा : भयंकर! 20 रुपयांसाठी तरुणाने आपल्या आईवर कुऱ्हाडीने केला हल्ला, हादरवून टाकणारं कारण आलं समोर
हाटी समाजाबाबत जाणून घ्या
हाटी समुदायातील लोक हे हिमाचल प्रदेश-उत्तराखंड सीमेवर राहतो. या समुदायाला केवळ 3 वर्षांपूर्वी अनुसूचित जमाती म्हणून घोषित करण्यात आले. या जमातीत शतकानुशतके बहुपतित्व प्रथा प्रचलित आहेत. परंतु, आता ती परंपरा कुठेतरी कालबाह्य झाली आहे.