कर्माचं फळ! भाजप नेते प्रफुल्ल लोढांना हनी ट्रॅप प्रकरणात अटक, तरुणींचे अश्लील फोटो बनवल्याचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
Prafulla lodha Arrest : भाजपचे नेते प्रफुल्ल लोढा यांना हनी ट्रॅप प्रकरणी अटक करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेमध्ये पेन ड्राईव्ह दाखवत हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्यांची पोलखोल केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रफुल्ल लोढा यांना हनी ट्रॅप प्रकरणी अटक

72 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या प्रकरणात समावेश
Prafulla lodha Arrest : भाजपचे नेते प्रफुल्ल लोढा यांना हनी ट्रॅप प्रकरणी अटक करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेमध्ये पेन ड्राईव्ह दाखवत हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्यांची पोलखोल केली आहे. ते म्हणाले की, नाशिकमध्ये 72 वरिष्ठ अधिकारी आणि काही नेते हे हनी ट्रॅपच्या प्रकरणात अडकले आहेत. हे प्रकरण जळगावातील जामनेरपर्यंत पसरलं गेलं आहे. त्यांनी लावून धरलेल्या या मुद्द्याने प्रफुल्ल लोढा चांगलेच जाळ्यात अडकले आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मुसक्या आवळल्या आहेत.
हेही वाचा : Extramarital affair : पत्नीने बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याच्या जेवणात मिसळलं विष, लग्न करावं की नाही? तरुणांच्यात भितीचं वातवरण
भाजप नेते प्रफुल्ल लोढा हनी ट्रॅपच्या जाळ्यात
नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणात अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि नेते हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची एकच चर्चा आहे. या प्रकरणाचे मूळ हे जळगाव असल्याचं ते म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील रहिवासी आणि भाजप नेते प्रफुल्ल लोढा यांच्यावर मुंबईत संबधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक गुन्हा हा पॉक्सो कायद्यांतर्गत आहे. तर दुसरा गुन्हा हा हनी ट्रॅपचा असल्याचं बोललं जात आहे.
पोलिसांनी प्रफुल्ल लोढांच्या अटकेनंतर मुंबई पोलिसांनी प्रफुल्ल लोढा यांच्यावर जळगाव, जामनेर आणि पहूर येथील संपत्तीचा तपास केला. पोलिसांनी त्यांच्या घरातून लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तु जप्त केल्या आहेत. दरम्यान, लोढांविरोधात यापूर्वीही मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात पोक्सो आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा : वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती, बुलेट नको मला थारच पाहिजे,पीडितेनं अंगावरच लिहिली सुसाईड नोट
तरुणींसोबत अश्लील कृत्य
62 वर्षीय प्रफुल्ल लोढ आणि 16 वर्षीय तरुणीला आणि तिच्या मैत्रिणीवा नोकरीला लावतो असे आमिष दाखवून त्या तरुणींसोबत गैरकृत्य केलं. त्या संबंधित पीडित तरुणींचे अश्लील फोटो काढले असा आरोपही करण्यात आला आहे. एवढंच नाही,तर तरुणींना लोढा हाऊसमध्ये बंद करून धमकावले होते.