Gold Prices Today: सोन्याचा भाव तर, वाढतच चाललाय! आज 1 तोळ्याची किंमत किती?
Gold-Silver Rates : गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली होती. मात्र आता सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होत आहे.
ADVERTISEMENT
Gold-Silver Rates : गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली होती. मात्र आता सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होत आहे. आज (21 ऑगस्ट) सोन्याचा भाव तब्बल 550 रुपयांनी वाढला आहे. जागतिक तसेच देशांतर्गत घडामोडींमुळेही सोन्याच्या रोजच्या दरात चढ उतार होते. आता सणसमारंभ येऊ लागल्याने सोने खरेदीकडे लोकांची पावले वळतात. त्यामुळे आजचे सोन्याचे भाव किती हे जाणून घेऊयात. (gold-silver price hike today 21 august gold rate in mumbai pune for 10 gram )
ADVERTISEMENT
अर्थसंकल्पानंतर सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणात घसरली होती, पण आता जागतिक घडामोडींमुळे पुन्हा एकदा सोने भाव खाऊ लागले आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, कालच्या तुलनेत (20 ऑगस्ट) आज सोन्याच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे. 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचे भाव 550 रूपयांनी वाढले आहेत. त्यानुसार त्याची किंमत 72, 650 रूपयांवरून आता 73, 200 रूपये इतकी झाली आहे. त्याचवेळी, एक किलो चांदीच्या भावात कोणताही बदल झालेला नाही आहे. एक किलो चांदी 87,000 रूपयांनी विकली जात आहे.
हे वाचलं का?
आज तुमच्या शहरातील सोन्याचे भाव काय?
मुंबई
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67, 100 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73, 200 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 900 रूपये आहे.
पुणे
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67, 100 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73, 200 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 900 रूपये आहे.
नागपूर
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67, 100 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73, 200 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 900 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67, 130 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73, 230 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 510 रूपये आहे.
हेही वाचा : Badlapur News: बदलापूरच्या घटनेमागे कुणाचा हात? CM शिंदेंनी कुणावर केले आरोप?
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हेही वाचा : Bharat Bandh: आज 'भारत बंद'ची हाक! काय सुरू आणि काय बंद राहणार? जाणून घ्या एका क्लिकवर
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT