Badlapur News: बदलापूरच्या घटनेमागे कुणाचा हात? CM शिंदेंनी कुणावर केले आरोप?
CM Eknath Shinde On Badlapur Crime: दोन चिमुकल्या मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं बदलापूरमध्ये हिंसाचार उसळला होता. आंदोलकांनी प्रशासनाला धारेवर धरत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. संतप्त नागरिकांनी पोलिसांवरही दगडफेक केल्यानं या आंदोलन चिघळलं होतं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
"...तरीही लोक मागे हटायला तयार नव्हते"
"'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांच्या जिव्हारी लागली...."
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
CM Eknath Shinde On Badlapur Crime: दोन चिमुकल्या मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं बदलापूरमध्ये हिंसाचार उसळला होता. आंदोलकांनी प्रशासनाला धारेवर धरत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. संतप्त नागरिकांनी पोलिसांवरही दगडफेक केल्यानं या आंदोलन चिघळलं होतं. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बदलापूरचं आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप शिंदेनी केला आहे.
ADVERTISEMENT
"...तरीही लोक मागे हटायला तयार नव्हते"
एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना काय म्हणाले? बदलापूरचं आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित होतं. फटाफट आंदोलन होतं तिथे स्थानिक लोक असतात. इथे स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते. इतर ठिकाणाहून गाड्या भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते. मंत्री महोदयांनी सर्व मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. तरीही लोक हटायचं नाव घेत नव्हते. याचा अर्थ त्यांना सरकारला बदनाम करायचं होतं. छोट्या मुलीची दुर्देवी घटना घडली, त्याचं राजकारण करता. ज्यांनी केलंय त्यांना लाज वाटली पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन आले होते. कुठे असे आंदोलन असतात का? असा सवालही शिंदेंनी उपस्थित केला.
हे ही वाचा >> Badlapur News : आंदोलकांना पोलिसी खाक्या दाखवल्या, 'इतक्या' जणांविरोधात FIR दाखल, किती जणांना अटक? वाचा सविस्तर
"मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांच्या जिव्हारी लागली..."
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यांना पोटदुखी, पोटसूळ उठलं आहे, हे कालच्या आंदोलनातून दिसत आहे. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे निर्देश मी कालच पोलीस आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे. कठोर कलम लावण्याचे निर्देश आम्ही दिले आहेत. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत. एसआयटी (विशेष तपास पथक) नेमलं आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Akola Crime: बदलापूरपाठोपाठ अकोलाही हादरलं! शाळेतील ६ मुलींवर विनयभंग, आरोपी शिक्षक गजाआड, नेमकं काय घडलंय?
या कुटुंबाच्या मागे सरकार आहे. कुटुंबला जे काही सहकार्य पाहिजे, ते सरकारकडून केलं जाईल. संस्थाचालकांची चौकशी करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये, यासाठी याप्रकरणाला फास्ट ट्रॅकवर घेऊन कठोर शिक्षा झाली की हा एक मेसेज जाईल. त्यानंतर अशा प्रकारचं कृत्य कुणी करणार नाही, असंही शिंदे म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT