Badlapur News : आंदोलकांना पोलिसी खाक्या दाखवल्या, 'इतक्या' जणांविरोधात FIR दाखल, किती जणांना अटक?
Badlapur Latest News : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं खळबळ उडाली. आरोपी अक्षय शिंदेला फाशीच्या शिक्षेची मागणी करत आंदोलनकर्त्यांनी रेलरोको केला. संतत्प नागरिकांनी पोलिसांवरही दगडफेक केली. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
काँग्रेसच्या महिला खासदार या घटनेची माहिती घेणार
मंत्री गिरीश महाजनांनी आंदोलकांना केलं होतं आश्वस्त, पण...
पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर केली कायदेशीर कारवाई
Badlapur Latest News : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं खळबळ उडाली. आरोपी अक्षय शिंदेला फाशीच्या शिक्षेची मागणी करत आंदोलनकर्त्यांनी रेलरोको केला. संतत्प नागरिकांनी पोलिसांवरही दगडफेक केली. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. जवळपास दहा तास मध्ये रल्वेची सेवा ठप्प झाल्यानं प्रशासनाची झोप उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करून रेल्वे सेवा पूर्ववत केली. या प्रकरणी पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल करत अटकेची कारवाई केली आहे. बदलापूरच्या आंदोलनात कायदा सुव्यवस्थेचे धिंदोडे उडाल्यानं पोलिसांनी ३०० जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून ४० जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेसच्या महिला खासदार या घटनेची माहिती घेणार
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. स्टेशन परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसच नागरिकांनी आजही बदलापूर बंदची हाक दिली आहे. बदलापूरच्या आंदोलनात पोलिसही जखमी झाले आहेत. तसच काँग्रेस पक्षाच्या महिला खासदार बदलापूरमध्ये जाऊन संबंधीत घटनेची माहिती घेणार आहेत. पोलीस अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक नेमण्यात आलं आहे. हे प्रकरण सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. बाल हक्क मंडळाचे सदस्यही बदलापूर घटनेची माहिती घेणार आहे.
हे ही वाचा >> Akola Crime: बदलापूरपाठोपाठ अकोलाही हादरलं! शाळेतील ६ मुलींवर अत्याचार, आरोपी शिक्षक गजाआड, नेमकं काय घडलंय?
मंत्री गिरीश महाजनांनी आंदोलकांना केलं होतं आश्वस्त
या घटनेबाबत काही दिवसांतच तपास पूर्ण होईल. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल. या प्रकरणी एसआयटी नेमली गेली आहे. हे प्रकरण सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे असणार आहे. या आंदोलनात कुणाचंही नेतृत्व नाही. कुणीही कुणाचं ऐकत नाही. तरुणांना राग येणे योग्य आहे. पण त्यामुळे रेल्वेसेवा बंद ठेवायची हा त्यामागचा उपाय नाही.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Bharat Bandh: आज 'भारत बंद'ची हाक! काय सुरू आणि काय बंद राहणार? जाणून घ्या एका क्लिकवर
आम्ही त्यांना विनंती करत सांगितलं की प्रशासनाने आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. विशेष तपास पथक नेमण्यात आलं आहे. पोलीस अधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबीत केलं आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये टाकलं आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या प्रकरणासाठी नियुक्ती करत आहोत. ही केस लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये चालवून जो आरोपी आहे, त्याला लवकरात लवकर शिक्षा देणार आहोत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT