Pune: बापरे! पुण्याला पावसानं पुन्हा झोडपलं; मेट्रो स्टेशनबाहेरची स्थिती पाहून बसेल धक्का
Pune Weather : पुणे मेट्रो स्थानकातील संपूर्ण परिसर पाण्याखाली बुडालेला दिसत आहे. ही परिस्थिती केवळ पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये झाली आहे
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पुण्याला पावसानं पुन्हा झोडपले
मेट्रो स्टेशनबाहेर पूरस्थिती!
पुण्यात अतिवृष्टीचा पावसाचा इशारा
Pune Weather Update : सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्रातील लोकही पावसामुळे हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत पुण्यातून एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये मेट्रो स्टेशनचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला दिसत आहे. येथे जोरदार पावसानंतर मुठा नदीपात्रातील खडकवासला धरणातून 35 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. (imd red alert of heavy rain to pune there entire area is flooded near pune metro station)
ADVERTISEMENT
मेट्रो स्टेशनबाहेर पूरस्थिती!
व्हिडीओमध्ये पुणे मेट्रो स्थानकातील संपूर्ण परिसर पाण्याखाली बुडालेला दिसत आहे. ही परिस्थिती केवळ पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये झाली आहे. अशावेळी मुंबईत 26 ऑगस्टपर्यंत हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो जो पुढील आठवड्यापर्यंत वाढू शकतो.
हेही वाचा : "पंतप्रधानांनी आधी आमच्या दीदींना सुरक्षा द्यावी, नंतर..."; 'लखपती दीदी' मेळाव्यापूर्वी संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील 24 तासांत राजधानी आणि उपनगरात मुसळधार ते 'अतिमुसळधार' पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहू शकतात तर कमाल आणि किमान तापमान 30 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
हे वाचलं का?
हेही वाचा : Gold Price: बाईईई... आता काय खरं नाय! किती महाग झालंय सोनं; आजचा भाव माहितीये का?
पुण्यात अतिवृष्टीचा पावसाचा इशारा
त्याचवेळी, पुणे हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राने 25 ऑगस्टला रायगड जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा' रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय पुणे, नागपूर, पालघर, ठाणे आणि रत्नागिरीमध्येही अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT