"पंतप्रधानांनी आधी आमच्या दीदींना सुरक्षा द्यावी, नंतर..."; 'लखपती दीदी' मेळाव्यापूर्वी संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा वर्षांनंतर आज जळगाव दौऱ्यावर येत आहेत. मोदींच्या उपस्थितीत जळगावात 'लखपती दीदीं'चा मेळावा पार पडणार आहे. जळगाव विमनातळ परिसरात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून बचत गटाच्या जवळपास दीड लाख महिला या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
लखपती दीदी मेळाव्याबाबत संजय राऊत काय म्हणाले?
"मुंबईचे लचके तोडण्याचं कारस्थान सुरु"
Sanjay Raut On Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा वर्षांनंतर आज जळगाव दौऱ्यावर येत आहेत. मोदींच्या उपस्थितीत जळगावात 'लखपती दीदीं'चा मेळावा पार पडणार आहे. जळगाव विमनातळ परिसरात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून बचत गटाच्या जवळपास दीड लाख महिला या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. जळगावात मोदींच्या भाषणाकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. तत्पूर्वी, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात एक आंदोलन सुरू आहे. पण महिलांच्या सुरक्षेबद्दल प्रधानमंत्र्यांनी एकही शब्द काढला नाही, ज्या जळगावत प्रधानमंत्री येणार आहेत, त्याच जळगावात पंधरा दिवसात ४ जणांवर अत्याचार झाला, प्रधानमंत्र्यांना कोणीतरी जाऊन सांगा, असं म्हणत राऊतांनी मोदींवर सडकून टीका केली आहे.(Prime Minister did not utter a single word about the safety of women, in Jalgaon where the Prime Minister is coming, 4 people were sexually assaulted in the same Jalgaon in fifteen days, someone go and tell the Prime Minister, Raut has criticized Modi)
ADVERTISEMENT
संजय राऊत मोदींवर टीका करत म्हणाले, मोदी जळगावला भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी आले आहेत. युक्रेन पोलांड रशिया तिकडे देखील भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला गेले होते. जळगावला देखील त्याच कामासाठी आले आहेत. निमित्त आहे, लखपती दिदी ज्या देशात लाखो बेरोजगार आहेत, त्यांना देखील लखपती करण्याची गरज आहे. महिलांना पैसे दिले जातात आणि मुख्यमंत्री विचारत आहेत पैसे मिळाले ना, पैसे मिळाले ना? कुणीतरी महिलेनं आवाज दिला, सरकारच्या बापाच्या पैसे आहेत का? लखपती दीदी आणि जनतेचा पैसा आहे.
हे ही वाचा >> Crime: महाराष्ट्रातील 'हे' शहर बनलंय जुगाऱ्यांचा अड्डा! पोलिसांनी आवळल्या ९ जणांच्या मुसक्या
हे वाचलं का?
प्रधानमंत्री येत आहेत. प्रधानमंत्री फिरत राहतील आणि आमच्या बहिणी न्यायासाठी इकडून तिकडे फिरत राहतील. जागा वाटपासंदर्भात काल महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख पक्षांची बैठक पार पडली. मुंबई हा एक मोठा प्रदेश आहे. महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथे मराठी माणसांचं काय वर्चस्व राहिलं आहे? असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.
राऊत पुढे म्हणाले, हे मुंबईचे लचके तोडण्याचे कारस्थान सुरू आहेत. त्याला शह देण्यासाठी मुंबई एकदा पुन्हा आमच्या ताब्यात असणे गरजेचे आहे, त्याच संदर्भातील जागा वाटप आम्ही करत आहोत. महाविकास आघाडी म्हणून हीच लढाई आहे, म्हणून कोणाच्या पोटात दुखत असेल त्याने त्याच्या दुखण्यावर ते औषध द्यावं. बंद दाराआड त्या संदर्भात कोणी बाहेरून काही सांगणार नाही आणि मीही सांगणार नाही.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Maharashtra Weather: मुंबईत पावसाची दमदार हजेरी! 'या' जिल्ह्यांना IMD कडून रेड अलर्ट जारी
ADVERTISEMENT
काल मुंबईचा विषय जवळजवळ संपत आलेला आहे आणि आता 27 तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राची चर्चा सुरू आहे. त्यांची हंडी फुटणार आहे, ते लटकणार आहेत. वर हंडी फोडतात, शेवटच्या थराला त्यांना काही जाता येणार नाही. त्याच्यामुळे ते जे असे लटकत असतात आणि मग खाली पडतात. त्यांचा थर कोसळला सुरुवात झाली आहे आणि हंडीवाले वर लटकणार आहेत. सरकारकडे पैसे नाही हे खर जरी असलं तरी सरकारकडे निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला किंवा शिवसेनेला पराभूत करण्यासाठी ज्या सुपार्या द्याव्या लागतात, त्यासाठी भरपूर पैसे आहेत.
आमदार खासदार खरेदी करण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांना विकत घेण्यासाठी मतं विकत घेण्यासाठी सुपाऱ्या देतात. त्यांचे भरपूर पैसे आणि शेकडो पैसे सरकारकडे आहेत. जनतेसाठी पैसे नाही. राजाच्या विकासासाठी पैसे नाहीत. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी पैसे नाही. महिलांना सुरक्षा देण्यासाठी पैसे नाही. बाकी पैसे जे आहेत ते राजकीय उधळपट्टी साठी आहेत. माणसं विकत घेण्यासाठी लहानसहान सुपाऱ्या देण्यासाठी भरपूर पैसे पडले आहेत, असंही राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT