Crime: महाराष्ट्रातील 'हे' शहर बनलंय जुगाऱ्यांचा अड्डा! पोलिसांनी आवळल्या ९ जणांच्या मुसक्या
Nagpur Crime Update: जुगार खेळून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाईची मोहिम राबवली आहे. राज्यातील नांदेड शहरातील सिटी सिन्फनीत या नामांकीत हॉटेलमध्ये पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या ९ जणांना अटक केली. या ठिकाणी पोलिसांनी १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
जुगार खेळणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
जुगार खेळणाऱ्या ९ जणांना अटक
एका नामांकीत हॉटेलमध्ये पोलिसांनी टाकली धाड
नांदेड, कुवरचंद मंडले
ADVERTISEMENT
Nagpur Crime Update: जुगार खेळून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाईची मोहिम राबवली आहे. राज्यातील नांदेड शहरातील सिटी सिन्फनीत या नामांकीत हॉटेलमध्ये पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या ९ जणांना अटक केली. या ठिकाणी पोलिसांनी १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गोविंद नरेंद्र जग्यावसी, सय्यद अख्तार सय्यद नसीर (दोघे, रा. साईनगर), यज्ञेश लक्ष्मीकांत भोकरकर (रा. भोकर), वीरसिंग दिलीपसिंग ठाकूर (रा. लोहार गल्ली), अरुण नागनाथ सोनटक्के, भुनेश सुनील जग्याशी (रा. रविनगर, कौठा), शेख असिफ शेख बाबू (रा. खय्युम प्लॉट), दिनेश पद्माकर चिटमवार (रा. होळी) आणि उद्धव भानुदास टोम्पे (रा. नवीन कौठा), अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Maharashtra Breaking News : PM मोदींच्या उपस्थितीत आज जळगावात पार पडणार ‘लखपती दीदी’ मेळावा
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा बसवण्यासाठी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या हॉटेलच्या एका रुममध्ये काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर विमानतळ पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ९ जणांना अटक केली. तसच त्यांच्याकडून १ लाख १४ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
"शहरातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉटेल सिटी सिन्फनीत एका खोलीत हा जुगार अड्डा सुरू होता. पोलिस पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना या जुगाराबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास या ठिकाणी सापळा रचून धाड टाकण्यात आली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Maharashtra Weather : पुण्यासह 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?
या धाडीत गोविंद नरेंद्र जग्यावसी, सय्यद अख्तार सय्यद नसीर (दोघे, रा. साईनगर), यज्ञेश लक्ष्मीकांत भोकरकर (रा. भोकर), वीरसिंग दिलीपसिंग ठाकूर (रा. लोहार गल्ली), अरुण नागनाथ सोनटक्के, भुनेश सुनील जग्याशी (रा. रविनगर, कौठा), शेख असिफ शेख बाबू (रा. खय्युम प्लॉट), दिनेश पद्माकर चिटमवार (रा. होळी) आणि उद्धव भानुदास टोम्पे (रा. नवीन कौठा) हे त्या ठिकाणी जुगार खेळत असताना पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस पुढील तपास करीत आहे, अशी माहिती विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण यांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT