लाइव्ह

Maharashtra Breaking News : "गेल्या दोन महिन्यात ११ लाख लखपती दीदी...", PM मोदी नेमकं काय म्हणाले? 

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra breaking news in marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगावात ‘लखपती दीदीं’चा मेळावा पार पडणार आहे. जळगाव विमानतळ परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जवळपास एक ते दीड लाख बचत गटाच्या महिला सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यात येत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी काय घोषणा करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

ADVERTISEMENT

तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौऱ्याचा आज अंतिम टप्पा सुरु आहे. राज ठाकरे वाशिम जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

ADVERTISEMENT

  • 02:16 PM • 25 Aug 2024

    PM Modi : "गेल्या दोन महिन्यात ११ लाख लखपती दीदी...", PM मोदी नेमकं काय म्हणाले? 

    गेल्या दोन महिन्यात ११ लाख लखपती दीदी बनल्या आहेत. लखपती दीदींमुळे कुटुंबाचं भाग्य बदललं आहे. पुढील पिढीला सशक्त करण्यासीठी हा अभियान राबवला जात आहे. महिलांसाठी मोदी सरकारनं विविध योजना आणल्या. बहिणाबाईंची कविता आजही समासाठी प्रेरणादायी आहेत. महाराष्ट्रातला कोणताही कोपरा असो किंवा इतिहासातील कोणताही कालखंड असो, मातृशक्तीचा योगदान अप्रतिम राहिला आहे. 
    आज देशभरातील लाखो सखी मंडळांसाठी ६ कोटींहून अधिक रुपये जारी केलं आहेत. लाखो बचत गटांशी जोडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील आमच्या भगिनींनाही कोट्यावधी रुपयांची मदत मिळाली आहे. या पैशांच्या माध्यमातून लाखो बहिणींना लखपती दीदी बनवण्यासाठी मदत होईल. तुम्ही सर्वांनी मला महाराष्ट्राची गौरवशाली संस्कृतीचं दर्शन घडवलं आहे. महाराष्ट्राचे हे संस्कार भारतातच नाही, तर जगात पसरलं आहे. मी कालच परदेश दौऱ्यातून भारतात परतलो. मी यूरोपच्या पोलंड देशात गेलो होतो. तिथेही मला महाराष्ट्राचे दर्शन घडलं. महाराष्ट्राची संस्कृती आणि येथील संस्कारांचं दर्शन घडलं. पोलंडचे लोक महाराष्ट्रातील लोकांचा खूप सन्मान करतात, असंही मोदी म्हणाले.

  • 01:11 PM • 25 Aug 2024

    Maharashtra News: मोदींच्या नेतृत्वातील विकासाचा रथ जळगावात- अजित पवार

    “मोदींच्या नेतृत्वातील विकासाचा रथ जळगावात आला आहे. मी आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात एवढ्या प्रचंड संख्येने महिलांनी महाराष्ट्रात पंतप्रधानांचं स्वागत केल्याचं पाहिलं नव्हतं. हे मी पहिल्यांदाच पाहत आहे,” असं अजित पवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौऱ्यावर आहेत.

     

  • 11:40 AM • 25 Aug 2024

    Maharashtra News : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला ठाकरे गटाचा विरोध

    छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिक रस्त्यावर उरतले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जळगाव दौरा असून ते छत्रपती संभाजीनगरहून जळगाव कडे जाणार आहेत. छत्रपती संभाजी नगर विमानतळाच्या बाजूला असलेल्या मातोश्री लॉन या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमलेत. दानवे यांच्या नेतृत्वात मोदींच्या दौऱ्याला विरोध केला जातोय. त्या दृष्टीनेच या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.

     

  • 10:04 AM • 25 Aug 2024

    Maharashtra News : राज ठाकरे आज वाशिम जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वाशिम जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच, वाशिम, रिसोड, कारंजा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार. हॉटेल दानिश एम्पायर येथे सकाळी 9 वाजता बैठक होणार. अमित ठाकरेही या बैठकीला उपस्थित असतील. राज ठाकरे रात्री पासूनच वाशिममध्ये मुक्कामी आहेत. कार्यकर्त्यांकडून त्यांचं जेसीबीतून फुल उधळून स्वागत झालं होतं.

  • ADVERTISEMENT

  • 10:02 AM • 25 Aug 2024

    पुण्यात आज रेड अलर्ट, दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता

    • पुणे शहरासह जिल्ह्याला आज हवामान खात्याचा रेड अलर्ट
    • पुणे शहरासह जिल्ह्यात आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता
    • आज सकाळपासून शहरात रिमझिम पावसाला सुरुवात
    • खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये देखील काल रात्रीपासून पाऊस
follow whatsapp

ADVERTISEMENT