India-Pakistan सीजफायरनंतर 'ही' 32 विमानतळे उड्डाणासाठी सज्ज! बुकिंग झाली सुरू, 'इथे' पाहा संपूर्ण लिस्ट

मुंबई तक

India-Pakistan Ceasefire : भारत आणि पाकिस्तानमध्ये सीजफायर लागू करण्यात आलं आहे. अशातच आता सोमवारी देशातील 9 राज्यांतील 32 विमानतळ पुन्हा सुरु करण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

India 32 Airports Booking Started
India 32 Airports Booking Started
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारत-पाकिस्तान सीजफायरनंतर 32 विमानतळे पुन्हा सुरु

point

देशात जारी करण्यात आला होता हाय अलर्ट

point

या ठिकाणची विमानतळे होती बंद

India-Pakistan Ceasefire : भारत आणि पाकिस्तानमध्ये सीजफायर लागू करण्यात आलं आहे. अशातच आता सोमवारी देशातील 9 राज्यांतील 32 विमानतळ पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. एअरलाईन्स कंपन्यांनी प्रवाशांसाठी पुन्हा बुकिंग सुरु केली आहे. या 32 विमानतळांना 9 मे पासून 15 मे   सकाळी 5.29 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते.

प्रेस रिलीजमध्ये काय म्हटलंय? 

एअरपोर्ट्स ऑथोरटी ऑफ इंडियाने सोमवारी एक प्रेस रिलीज जारी केलं. एएआयने यात म्हटलंय, बंद केलेले सर्व एअरपोर्ट्स तत्काळ एअरक्राफ्ट ऑपरेशनसाठी तयार आहेत. याचसोबत प्रवाशांना त्यांच्या उड्डाणांची माहिती संबंधीत एअरलाईन्स कंपनीच्या वेबसाईट्सवर पाहता येणार आहेत.

हे ही वाचा >> Maharashtra SSC Board Result 2025: मोठी बातमी, महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, 'या' दिवशी पाहता येईल निकाल

जम्मू-काश्मीर मधील अवंतीपूर,जम्मू, श्रीनगर, लडाखमील लेह, थॉईसे, हिमाचल प्रदेशचे कांगडा (गग्गल), कुल्लू-मनाली (भुंतर), शिमला, तसच चंदीगढ, पंजाबमीधल आदमपूर, पठाणकोट, अमृतसर, बठिंडा, हलवारा, लुधियाना, पटियाला, उत्तर प्रदेशमधील हिंडन, सरसावा, हरियाणातील अंबाला, राजस्थानमधील बीकानेर, जैसलमेर, जोधपूर, किशनगड, उत्तरलाई आणि गुजरातमधील भुज, जामनगर, कांडला, केशोद, मुंद्रा, नालिया, पोरबंदर, राजकोट (हिरासर) या ठिकाणचे विमानतळ बंद होते.

देशात जारी करण्यात आला होता हाय अलर्ट

22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दशहतवादी हल्ल्याला भारतीय सेनेनं 7 मे च्या रात्री जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्ड्यांना उद्ध्वस्त केलं. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानवर कारवाई केली होती. यानंतर देशात हायअलर्ट जारी करण्यात आला होता. त्यामुळे भारतातील 18 विमानतळं काही काळासाठी बंद करण्यात आले होते. 

हे ही वाचा >> Personal Finance: गुंतवणुकीवर किती पैसे मिळणार हे सत्य कोणीही सांगत नाही, 70 चा फॉर्म्युला तुम्हाला टाकेल हादरवून!

हे वाचलं का?

    follow whatsapp