Operation Sindoor : पाकिस्तानममध्ये दहशतवादी संघटनांचा केला खात्मा! ऑपरेशन सिंदूरचे 'ते' 9 फोटो आले समोर

मुंबई तक

Operation Sindoor Air Strike Viral Photos : भारतीय सैनिकांनी मंगळवारी उशिरा रात्री पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केलं. तिन्ही सेना दलाने एकत्रितपणे ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं.

ADVERTISEMENT

Operation Sindoor Viral Photos
Operation Sindoor Viral Photos
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारताने पाकिस्तानच्या त्या ठिकाणांवरच का केला हल्ला?

point

ऑपरेशन सिंदूरचे ते 9 फोटो झाले प्रचंड व्हायरल

point

पाकिस्तानमध्ये कोणत्या ठिकाणी होते दहशतवाद्यांचे अड्डे?

Operation Sindoor Air Strike Viral Photos : भारतीय सैनिकांनी मंगळवारी उशिरा रात्री पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केलं. तिन्ही सेना दलाने एकत्रितपणे ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं. या ऑपरेशनच्या माध्यमातून भारतीय सेना दलाने पाकिस्तानच्या 9 दशहतवादी अड्ड्यांना टार्गेट केलं. या नऊ दशहतवादी अड्ड्यांपैकी चार पाकिस्तान आणि पाच POK मध्ये होते. भारतीय सेनेनं POK मध्ये बाघ, कोटली, भीमबेर आणि चेक आमरूमध्ये हल्ला केला आहे. तर POK मध्ये मुजफ्फराबाद, गुलपूर, सियालकोट, मुरीदके आणि बहावलपूरमध्ये एअरस्ट्राईक केलं.

भारतीय सेनेनं जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तयब्बा आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या अड्ड्यांना टार्गेट केलं. भारतीय सेना दलाने जैशच्या मरकज सुभान अल्लाह (बहावलपूर), लष्करचे मरकज तैयब्बा (मुरीदके), जैशचा तेहरा कलां (शकरगढ), हिजबूलचा महमूना (सियालकोट), लष्करचा मरकज अहले हदित (भीमबेर), जैशचा मरकज अब्बास (कोटली), हिजबूलचा मसकर राहिल शाहिद (कोटली), लष्करचा सवाई नाला कॅम्प (मुजफ्फराबाद) आणि बिलाल कॅम्प (मुजफ्फराबाद) वर एअर स्ट्राईक केलं.

भारताने त्या 9 ठिकाणांवरच का हल्ला केला?

भारताने पाकिस्तानच्या बहावलपूर प्रांतात एअरस्ट्राईक केलं. हे ठिकाण आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. इथे जैश ए मोहम्मदचा हेडक्वार्टर आहे. इंडियन आर्मीने बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या मरकजचा हेडक्वार्टर आहे. इंडियन आर्मीने बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या मरकज सुभान अल्लाहचा खात्मा केला आहे. इथेच पुलवामा हल्ल्याचा कट रचला गेला होता. जैशनेच 2001 मध्ये संसद आणि 2019 मध्ये पुलवामा हल्ला घ\वन आणला होता. 

हे वाचलं का?

    follow whatsapp