न्याय मागायला गेला अन् न्यायालयातच गेला जीव.. नेमकं काय घडलं?
न्यायनिवड्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला न्याय सुरू असतानाच हृदयविकाराच झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कल्याण न्यायालय परिसरात घडली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
न्यायासाठी गेला अन् जीव गेला
न्यायालयातच कोसळला आणि जीव गेला
Kalyan News : कल्याण न्यायालयामध्ये मंगळवारी (5 मार्च) एक धक्कादायक घटना घडली. दुपारच्या सुमारास एका घटनेच्या संदर्भात न्याय निवाड्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा न्यायाधीशांच्या दालनाबाहेर हृदयविकाराचा (Heart Attack) तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यांना उपचारार्थ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत (Death) घोषित केले. या घटनेने न्यायालयीन परिसरामध्ये एकच खळबळ उडाल्याचे दिसून आले.
ADVERTISEMENT
दालनाबाहेरच अटॅक
एका न्यायनिवाड्याच्या संदर्भात संजय नायक आपल्या महिला नातेवाईकांसह कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात आले होते. न्यायाधीशांच्या दालनामध्ये अन्य खटल्यांची सुनावणी सुरू होती. यावेळी संजय नायक दालनाबाहेर बाकड्यावर बसून चर्चा करीत होते. त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते बाकड्यावरून खाली कोसळले.
संजय नायक खाली कोसळताच त्यांना आकडी आल्याचा संशय उपस्थित नागरिकांना आला, त्यामुळे ते शुद्धीत येतील अशी आशा बाळगून काही लोक त्यांच्याजवळ थांबले. मात्र खूप उशिरानेही त्यांना शुद्ध आली नसल्याने प्रवीण गडा या युवकाने त्यांना आपल्या शरीरातील सीपीआर) त्यांच्या शरीरात श्वाच्छोश्वास देण्यास सुरुवात केली.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> India आघाडीला झटका! लोकसभेच्या 543 जागांच्या सर्व्हेत काय?
त्यानंतर काही क्षण त्यांनी प्रतिसादही दिला, डोळेही उघडले. त्यामुळे त्यांना बाकड्यावर झोपवून पुन्हा त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र त्यानंतरही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांना तात्काळ रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अनेकांनी गमावला जीव
कल्याण न्यायालयात पाच महिन्यापूर्वी वकील म्हणून कार्यरत असणारे प्रमोद गवई न्यायालयीन आवारातील पत्राच्या शेडमध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र तात्काळ रुग्णालयात त्यांना भरती केल्याने त्यांचा जीव वाचला होता. तसेच कल्याण न्यायालयातील वकील रसाळ यांना देखील ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला होता.
ADVERTISEMENT
ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यातील पक्षकार न्यायनिवाड्यासाठी कल्याण सत्र न्यायालयात येत असून न्यायालयात कामाचा ताणही मोठ्या प्रमाणात असतो.
ADVERTISEMENT
कल्याण जिल्हा न्यायालय वकील संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांनी यासंदर्भात जिल्हा व सत्र न्यायाधीश यांना निवेदन देऊन न्यायालयीन आवारात तात्काळ प्राथमिक उपचार व्हावेत याकरिता उभारणी करण्याची मागणी केली आहे.
पुणे जिल्हा न्यायालयात अद्यावत डिस्पेंसरी उघडण्यात आले असून कल्याण न्यायालयातही उघडून न्यायालयात घडणाऱ्या दुःखद घटनांना असे निवेदनात वकील जगताप यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा >> Jayashree Thorat : थोरातांची तिसरी पिढी सक्रिय राजकारणात!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT