India आघाडीला झटका! लोकसभेच्या 543 जागांच्या सर्व्हेत काय?
देशात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा 'मोदी लाटेचा' बळी ठरला होता, त्यामुळेच काँग्रेसला केवळ 42 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर 2019 मध्ये निवडणुका झाल्या त्यामध्ये काही जागा काँग्रेसच्या वाढल्याही मात्र एका जुन्या पक्षाची एवढी वाताहात होणे हे त्या पक्षाच्या दृष्टीने वाईटच होते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लोकसभेत इंडिया आघाडील बसणार धक्का
इंडिया आघाडीला बसणार पुन्हा धक्का
Lok Sabha Election: देशात सध्या निवडणुकीचा हंगाम जोरदार सुरू आहे. निवडणुकीचा हंगाम सुरू झाल्याने सूत्रांकडून असंही सांगण्यात आलं आहे की, पुढील आठवड्यात देशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकांमुळे सर्वच राजकीय पक्षांनी आता कंबर कसली आहे.
ADVERTISEMENT
लोकसभा निवणुका एप्रिल ते मे महिन्यादरम्यान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक होणार असल्याने आता ओपिनियन पोल आणि सर्व्हेंचा जोरात बाजार सुरू आहे.
आघाडीच्या विजयाचेही भाकी
या सर्वेक्षणातून काही भाजपच्या तर काही इंडिया आघाडीच्या विजयाचेही भाकीत करण्यात आले आहे. या सगळ्यामध्ये इंडिया टीव्ही-सीएनएक्सचा ओपिनियन पोलही नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्या सर्व्हेमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्ष भारतावरील जनतेच्या मूडबद्दल सांगणार आहोत.
हे वाचलं का?
लोकसभा निवडणुकांच्या आधीच देशाचा नेमका मूड काय आहे. ते जाणून घेण्यासाठी ओपिनियन पोल घेण्यात आला आहे. त्या ओपिनियन पोलमध्ये 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत देशाच्या सत्तेचा मुकूट कोणत्या पक्षाच्या हाती येणार या गोष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
आघाडीमध्ये बिघाडी
इंडिया टीव्ही-सीएनएक्सने 5 ते 23 फेब्रुवारी दरम्यान देशातील सर्व 543 लोकसभा जागांवर हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात 1 लाख 62 हजार लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये 84352 पुरुष आणि 78550 महिलांचा समावेश करण्यात आला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Sanjay Raut: 'मविआ' च्या बैठकीनंतर राऊत काय म्हणाले,'आमचे मतभेद...'
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि एनडीएच्या युतीचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी गेल्या वर्षी इंडिया आघाडीची स्थापन केली होती. मात्र सध्या या आघाडीमध्ये बिघाडी होताना दिसून येत आहे. तरीही काँग्रेस या आघाडीसोबत निवडणूक लढवण्याच्याच मानसिकतेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
एकला चलो रे
इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सने केलेल्या ओपिनियन पोलनुसार लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी देशातील 543 लोकसभा जागांपैकी फक्त 98 जागांवर विजयी होऊ शकते असं सांगण्यात आलं आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या जागांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या नाहीत. कारण ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये एकला चलो रेचा नारा देत निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, मात्र तरीही त्या इंडिया आघाडीसोबत असल्याचे सांगण्यात येत आहे.
इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या ओपिनियन पोलनुसार आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची ऐतिहासिक घसरण होण्याची शक्यता आहे. या सर्व्हेनुसार या निवडणुकीत काँग्रेसला केवळ 37 जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या इतिहासात यावेळसारखी वाईट परिस्थिती काँग्रेसची कधीच झाली नाही.
देशात 2014 आणि 2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसची स्थिती बिलकूल चांगली नव्हती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हा पक्ष 'मोदी लाटेचा' बळी ठरला, त्यामुळेच काँग्रेसला केवळ 42 जागा मिळाल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत पक्षाने आपली कामगिरी सुधारली आणि 52 जागा जिंकल्या असल्या तरी देशातील सर्वात जुन्या पक्षासाठी ही संख्या दयनीय असल्याचे मत अनेक राजकीय विचारवंत व्यक्त करतात.
हे ही वाचा >> Mahayuti : बच्चू कडूंच्या गौप्यस्फोटाने खळबळ; म्हणाले, "सगळ्या जागा भाजप..."
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT