अहो..सेल्फी काढूया! पत्नीने पतीला पूलावरून भीमा नदीत ढकललं, नंतर गेमच पलटी झाला, पोलिसांनी असं काही केलं..

मुंबई तक

Husband And Wife Clash Viral News :  पतीला दिला धक्का, कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यातील गुरजापूर बैराज येथे फोटो काढण्याच्या बहाण्याने पत्नीने पतीला पुलावरून नदीत ढकललं, असा आरोप पतीने केला होता.

ADVERTISEMENT

Wife Pushed Husband In Bhima River
Wife Pushed Husband In Bhima River
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीने पतीला पुलावरून नदीत का ढकललं?

point

पोलीस तपासात सत्य आलं समोर

point

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?

Husband And Wife Clash Viral News :  पतीला दिला धक्का, कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यातील गुरजापूर बैराज येथे फोटो काढण्याच्या बहाण्याने पत्नीने पतीला पुलावरून नदीत ढकललं, असा आरोप पतीने केला होता. पण आता पतीच्याच अडचणी वाढल्या आहेत आणि त्याचावर जेलमध्ये जाण्याचा धोका वाढला आहे. कारण पत्नी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आलीय. आता पती आणि तिच्या कुटुंबातील 10 अन्य सदस्यांविरोधात बाल विवाह निषेध अधिनियम-2006 आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ततप्पा असं आरोपीचं नाव आहे.

रायचूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. एफआयआरमध्ये पीडितेच्या तक्रारीनुसार म्हटलंय की, पती ततप्पाने तिचं दोनवेळा लैंगिक शोषण केलं होतं. एकदा लग्नाच्या रात्री आणि त्यानंतर एक महिन्यांनी अल्पवयीन पत्नीला सुधारगृहात पाठवण्यात आलं. 

हे ही वाचा >>  निवृत्तीच्या अवघ्या 48 तास आधी मिळालं प्रमोशन... अंडरवर्ल्ड हादरवणारे ACP दया नायक आहेत तरी कोण?

त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं? 

आरोपीला माहित होतं की, पत्नी अल्पवयीन आहे. असं असतानाही त्याने पत्नीचं लैंगिक शोषण केलं. याप्रकरणी आधी पोक्सो अंतर्गत 2012 नुसार गुन्हा दाखल न झाल्याने राज्य बाल अधिकार आयोगाने रायचूर महिला पोलीस स्टेशनला चौकशीच्या घेऱ्यात घेतलं होतं. बाल आयोगाने आयजीकडे तक्रार नोंदवली होती. दरम्यान, बाल संरक्षण युनिटने अल्पवयीन पत्नीला ताब्यात घेतलं आणि तिला सुधारगृहात पाठवलं.

पोलिसांनी सुरु केला कसून तपास

रायचूर महिला पोलिसांनी याप्रकरणाची सखोल चौकशी केली. याआधी आरोपी पती ततप्पाने आरोप लावला होता की, फोटो काढण्याच्या बहाण्याने त्याच्या पत्नीने त्याला गुरजापूर पूलाजवळ असलेल्या नदीत ढकललं होतं. पण त्याने कसाबसा त्याचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. जर कृष्णा नदीच्या पुलावर पती पत्नीत भांडण झालं नसतं, तर बाल विवाहाचं हे प्रकरण समोर आलं नसतं. अशा प्रथांवर आळा घालण्याची खूप आवश्यकता आहे. 

हे ही वाचा >> मुंबईची खबर: समुद्राचं पाणी गोडं करण्यासाठी नव्या प्लांटची उभारणी! महापालिकेचा मोठा प्रोजेक्ट...

हे वाचलं का?

    follow whatsapp