मुंबईची खबर: समुद्राचं पाणी गोडं करण्यासाठी नव्या प्लांटची उभारणी! महापालिकेचा मोठा प्रोजेक्ट...
मुंबईतील वर्सोवामध्ये समुद्राचं पाणी गोडं करण्यासाठी महापालिकेकडून प्लांट उभारण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे. वर्सोवामध्ये उभारण्यात येणाऱ्या या प्लांटमुळे मुंबईतील नागरिकांना दररोज जवळपास 200 एमएलडी पिण्यायोग्य पाणी मिळेल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

समुद्राचं पाणी गोडं करण्यासाठी मुंबईत नव्या प्लांटची उभारणी

मुंबई महापालिकेचा 'असा' आहे नवा प्लॅन
Mumbai News: मालाडच्या मनोरीनंतर आता वर्सोवामध्ये समुद्राचं पाणी गोडं करण्यासाठी महापालिकेकडून प्लांट उभारण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे. वर्सोवामध्ये उभारण्यात येणाऱ्या या प्लांटमुळे मुंबईतील नागरिकांना दररोज जवळपास 200 एमएलडी पिण्यायोग्य पाणी मिळेल. बीएमसी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्लांटसाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) मागवण्यात आले आहेत. हे डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्सफर (DBFOT) या तत्त्वावर विकसित केले जाईल. या प्रकल्पात खाजगी गुंतवणूकीचा समावेश असून तज्ज्ञांकडून मदत घेतली जाईल.
मनोरीपेक्षा अनुकूल वातावरण
मुंबईतील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्या तुलनेत पाणी पुरवठ्यासाठीच्या जलाशयात वाढ झालेली नाही. त्याकरीता मुंबई महापालिकेने निःक्षारीकरण प्रकल्पाची घोषणा केली. प्रकल्पासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, समुद्राचं पाणी गोडं करण्यासाठी वर्सोवामधील भौगोलिक स्थिती किंवा तिथलं वातावरण हे मनोरीपेक्षा अनुकूल आहे. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांच्या मते, सध्या प्रोजेक्टची सुरुवातीचा टप्पा असून लवकरच याची स्थिती स्पष्ट होईल.
हे ही वाचा: निवृत्तीच्या अवघ्या 48 तास आधी मिळालं प्रमोशन... अंडरवर्ल्ड हादरवणारे ACP दया नायक आहेत तरी कोण?
टेंडरची प्रक्रिया रद्द करावी लागली
तसेच, मालाडच्या मनोरीमध्ये समुद्राचं पाणी गोडं करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर टेंडर जाहीर करण्यात येईल. यामध्ये काही टेक्निकल बाबींमुळे हा प्रकल्प गेल्या 18 महिन्यांपासून रखडला आहे. या काळात, टेंडरची प्रक्रिया रद्द करावी लागली, ज्यामुळे हा प्रोजेक्ट पुढे जाऊ शकला नाही.
हे ही वाचा: इंस्टाग्रामवर विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेचे घाणेरडे चॅट्स! अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल... प्रकरण थेट पोलिसात
प्रकल्पासाठी एकूण खर्च
मनोरी प्रोजेक्टच्या माध्यमातून मुंबईला दोन टप्प्यांमध्ये दररोज 400 एमएलडी पाणी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. तसेच, या प्रकल्पावर महापालिका 3,520 करोड रुपये खर्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिका नागरिकांना पिण्यायोग्य पाणी मिळावं, यासाठी प्लांटची निर्मिती करणार असून या प्लांटसाठी मनपा 1600 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. याव्यतिरिक्त, पुढील 20 वर्षांपर्यंत या प्लान्टची देखभाल आणि दुरुस्तीसाठी 1920 रुपये खर्च केले जाणार आहेत. अशाप्रकारे, समुद्राचं पाणी गोडं करण्यासाठीच्या या प्रकल्पासाठी एकूण 3,520 रुपये खर्च येणार असल्याचं सांगितलं जात आहे.