Maharashtra Weather: कोकणात पावसाचा लपंडाव, तर दुष्काळी भागात मान्सूनचा येलो अलर्ट जारी

मुंबई तक

Maharashtra Weather Today: 31 जुलै रोजी हवामान विभागाने राज्यातील हवामानाच्या परिस्थितीचा नेमका काय अंदाज वर्तवला आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया. 

ADVERTISEMENT

सातारा, कोल्हापूरसह कोकणात कोसळणार पावसाच्या सरी (फोटो सौजन्य: Grok)
सातारा, कोल्हापूरसह कोकणात कोसळणार पावसाच्या सरी (फोटो सौजन्य: Grok)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

31  जुलै 2025 रोजी हवामान अंदाजाबाबत महत्त्वाची अपडेट

point

'या' ठिकाणी मान्सूनचा येलो अलर्ट जारी

Maharashtra Weather: भारतीय हवामान खात्याने (IMD) नुसार राज्यात 31  जुलै 2025 रोजीच्या हवामान अंदाजाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. यंदाच्या मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यात राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, काही भागात हवामानात बदल दिसून येऊ शकतो.अशातच 31 जुलै रोजी हवामान विभागाने राज्यातील हवामानाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. 

हेही वाचा : भयंकर! शिक्षिका विद्यार्थ्याला करायची व्हिडिओ कॉल, नंतर न्यूड होऊन करायची उत्तेजित

कोकण :

राज्यातील कोकणभागातील कोकण किनारपट्टी, विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणाला समुद्र लागून असल्याने समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. तर कोकणातील मान्सूनच्या अलर्टबाबात हवामान खात्याने कोणताही इशारा दिला नाही. 

पश्चिम महाराष्ट्र : 

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे सारख्या भागांचा समावेश होता. यापैकी पुणे, सातारा आणि कोल्हापूरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोद होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमान हा 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस आहे. 

हेही वाचा : पुणे तिथे काय उणे, बाईकवरून तरुणी आणि तरुणाचा उघडपणे रोमान्स, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मराठवाडा आणि विदर्भ : 

मराठवाडा या भागांत छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्ध्यासारख्या भागात हलका पाऊस किंवा रिमझिम पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. कमाल तापमान 33-35 अंश सेल्सिअस, तर किमान 27 अंश सेल्सिअस तापमानाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने अंदाज वर्तवला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp