मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला कोर्टाने सुनावली सर्वात भयंकर शिक्षा, दारू पिऊन 7-8 महिने केला अत्याचार
Ambajogai Crime News : पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नराधम बापाला अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नराधम बापाने लेकीवर केला बलात्कार

पीडित तरुणीनं धक्कादायक प्रकाराबाबत आईल सांगितलं

न्यायालयाने आरोपीला सुनावली कठोर शिक्षा
Ambajogai Crime News : पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नराधम बापाला अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी वकील लक्ष्मण फड यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. न्यायमूर्ती अजितकुमार भस्मे यांच्या खंडपीठाने हा निर्णय घोषित केला. बाळू उर्फ बाळासाहेब महादेव गायकवाड असं आरोपीचं नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, पीडीत मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत उसतोडीच्या कामासाठी बाहेर गेली होती. अचानक तिच्या पोटात दुखू लागल्याने ती आईसोबत दवाखान्यात गेली. त्यावेळी डॉक्टरांनी पीडित मुलगी गर्भवती असल्याचं तिच्या आईला सांगितलं. त्यानंतर पीडितेच्या आईने तिला याबाबत विचारले असता, तिने घडलेला प्रकार सांगितला.
हे ही वाचा >> निवृत्तीच्या अवघ्या 48 तास आधी मिळालं प्रमोशन... अंडरवर्ल्ड हादरवणारे ACP दया नायक आहेत तरी कोण?
त्या गावात नेमकं काय घडलं होतं?
पीडित मुलीनं आईला सांगितलं की, तिचा बाप आरोपी बाळु उर्फ बाळासाहेब महादेव गायकवाड हा गेल्या सात ते आठ महिन्यापासून दारू पिऊन तिच्यावर राहत्या घरी अत्याचार करायचा. याप्रकरणी पीडितेनं 7 फेब्रुवारी 2024 रोजी धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार गुरनं क. 24/2024 कलम 376, 376 (2) (एफ), 376 (2) (आय), 376 (2) (एन) भादंवी, 4 (2), 6 पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
पीएसआय प्रकाश शेळके यांनी याप्रकरणाचा तपास करून आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात खटला सुरू झाल्यावर सरकार पक्षाच्या वतीने एकूण ७ साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यामध्ये पीडित मुलगी, तिची आई व डीएनए प्रोफाईल करणारा साक्षीदार यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाच्या वतीने वकील लक्ष्मण फड यांनी बाजू मांडली.
हे ही वाचा >> इंस्टाग्रामवर विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेचे घाणेरडे चॅट्स! अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल... प्रकरण थेट पोलिसात
आरोपीने गुन्हा केला आहे, हे पुराव्यासहीत न्यायालयात सिद्ध केलं. याप्रकरणी न्यायालयाने म्हटलं की, आरोपीने केलेलं कृत्य हे अमानवी आहे. असा प्रकार एखाद्या दुर्मिळ प्रकरणातच होतो. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती अजितकुमार भस्मे यांनी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.