'मविआ'च्या बैठकीतील निर्णयच राऊतांनी सांगितला, 'आंबेडकरांच्या प्रस्तावाला...'

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mahavikas Aghadi vanchit
Mahavikas Aghadi vanchit
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'मविआ' आणि 'वंचित'मध्ये कोणतेच मतभेद नाहीत

Sanjay Raut : 'मोदींची हुकूमशाही उलथवायची आहे यावर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि आमचं एकमत असल्याचे सांगत वंचित हा आता आमच्या सोबत असायला पाहिजे' असं आमच्या तिन्ही पक्षांची इच्छा असल्याचेही खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसून लोकसभेच्या 48 जागांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  

महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटप व निवडणुकीती पुढील रणनीती काय असणार याविषयी या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Loksabha Election: 'महायुतीनं अश्वासन पाळावं', राष्ट्रवादीनं स्पष्टच सांगितलं

खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, शिवसेना, काँग्रेस आणि पवार गटाबरोबरच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांसोबत कोणत्याही मतभेदाशिवाय बैठक पार पडली. वंचितची चार पक्षांसोबत सकारात्मक चर्चा होऊ कोणत्याही जागेविषयी मतभेद या घडीला झाले नाहीत. त्यामुळे ही बैठक सकारात्मक चर्चा करत पार पडल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.

अॅड. प्रकाश आंबडेकर यांनी लोकसभेच्या जागांबाबर तिन्ही पक्षाकडे त्यांनी प्रस्ताव दिला आहे. त्यावर सकारात्मक चर्चा होऊन आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊनच याचा निर्णय जाहीर करू असंही त्यांनी स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीतील शरद पवार, जयंत पाटील, खासदार संजय राऊत व वंचितचे महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे समोरा समोर चर्चा झाल्याने या बैठकीतून नेमका काय निर्णय झाला हे आम्ही लवकरच जाहीर करून असंही खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> उद्धव ठाकरेंवर भडकले बावनकुळे; म्हणाले, "तुम्ही मिंधे..."

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT