'दम असेल तर PM मोदींनी म्हणावं ट्रम्प खोटारडे आहेत..', राहुल गांधींचं थेट आव्हान
ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेत सुरू असलेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना थेट आव्हान दिलं आहे की, त्यांनी संसदेत सांगावं की, ट्रम्प हे खोटारडे आहेत.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. कारण दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले चढवले जात होते. किमान 4 दिवस दोन्ही बाजूने मिसाइल, ड्रोन हल्ले सुरू होते. ज्यामुळे दोन्ही देश हे पूर्णपणे युद्धाच्या उंबरठ्यावर उभे ठाकले होते. पण त्यानंतर अचानक डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की, 'भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. दोघांमध्ये सुरू असलेले हल्ले हे थांबवण्यात आलेले आहे.' दरम्यान, याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे.
'पंतप्रधान मोदींमध्ये इंदिरा गांधी यांच्या तुलनेत 50 टक्केही दम असेल तर ते इथे संसदेत थेट म्हणतील की, अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे खोटारडे आहेत. त्यांच्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झालेली नाही. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी हे आज (29 जुलै) संध्याकाळी बोलावं.' असं थेट आव्हान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे.
हे ही वाचा>> 'हमारी सेना ने तो ठोक दिया...', पहलगाम हल्ल्यावर बोलताना अमित शाह नेमकं काय म्हणाले?
'PM मोदींमध्ये दम असेल तर त्यांनी म्हणावं डोनाल्ड ट्रम्प खोटारडे, त्यांनी सीझफायर केलेलं नाही'पाहा राहुल गांधी नेमकं काय म्हणाले
'डोनाल्ड ट्रम्प यांनी 29 वेळा की, मी भारत-पाकिस्तानमध्ये सीझफायर घडवून आणलं. जर ते खोटं बोलत असतील तर पंतप्रधानांनी इथे आपल्या भाषणात सांगावं की, ट्रम्प खोटं बोलत आहेत.'
'जर दम आहे तर इथे पंतप्रधानांनी बोलावं की, ट्रम्प खोटं बोलतोय.. जर त्यांच्यामध्ये (नरेंद्र मोदी) इंदिरा गांधींप्रमाणे दम असेल तर ते इथेच म्हणजे सभागृहातच बोलतील की, 'डोनाल्ड ट्रम्प तुम्ही खोटारडे आहात. तुमच्यामुळे सीझफायर झालेलं नाही. तसंच आमच्या कोणत्याही लढाऊ विमानाचं नुकसान झालेलं नाही..'