Mahayuti : बच्चू कडूंच्या गौप्यस्फोटाने खळबळ; म्हणाले, "सगळ्या जागा भाजप..."

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

bachchu kadu big statement on lok sabha seat sharing mahayuti eknath shinde ajit pawar maharashtra politics
लोकसभेच्या सगळ्या जागा भाजप लढवेल.
social share
google news

Bachchu Kadu Big statement On Lok Sabha Seat Sharing : आगामी लोकसभा निवडणूक कोणत्याहीक्षणी लागण्याची शक्यता आहे. या निवडणुसाठी सर्व पक्षांची जागावाटप आणि उमेदवारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. असे असताना लोकसभेच्या सगळ्या जागा भाजप लढवेल. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, असा मोठा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांचे आमदार आणि प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केला आहे. (bachchu kadu big statement on lok sabha seat sharing mahayuti eknath shinde ajit pawar maharashtra politics) 

बच्चू कडू पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी लोकसभेच्या जागावाटपावर बच्चू कडू यांना प्रश्न विचारला होता. यावेळी बच्चू कडू म्हणाले की,आम्ही जनतेशी बांधिल आहोत, ते म्हणतील त्या पद्धतीने जाऊ. आता (शिंदे-पवारांनी) त्यांचा विचार करावा, त्यांना किती जागा भेटतील किंवा नाही भेटतील. अजित दादांना किती जागा देतील? मुख्यमंत्री शिंदेंना किती मिळतील? दरम्यान असंही होऊ शकतं सगळ्याच जागा भाजप लढवेल, आणि माणसं (उमेदवार) शिंदे साहेबांची आणि अजितदादांची राहतील...आणि चिन्ह भाजपचं असेल असा खळबळजनक गौप्सस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे. 

हे ही वाचा : ठाकरेंशी वैर घेऊन भाजपसोबत गेलेले शिंदे तहात फसले!

शिंदे साहेबांची शिवसेना दिसली पाहिजे. तुम्ही जर त्यांना काखीत दाबून ठेव तर बिचवा काढायची वेळ आली नाही पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. तसेच सध्या लोकसभा निवडणूक लढवण्याची आमची मानसिकता नाही, आमची मानसिकता विधानसभेची फक्त अमरावती किंवा अकोलामध्ये निवजणूक लढू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नवनीत राणाच्या धमकीवर काय म्हणाले? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. नवनीत राणा यांना धमकी देणाऱ्यांना पाकिस्तानमधून ओढून आणलं पाहिजे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून नवनीत राणांना धमकी येत असेल तर मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह आहे. मोदींच्या सरकारमधील खासदाराला जर धमकी येत असेल तर कायदा कुठे राहिला?असा सवाल बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित केला. 

हे ही वाचा : Loksabha Election: 'महायुतीनं अश्वासन पाळावं', राष्ट्रवादीनं स्पष्टच सांगितलं

    follow whatsapp

    ADVERTISEMENT