Maharashtra Weather: मुंबईकरांची होणार धावपळ! तुमच्या भागांत कसा असेल पाऊस?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत गेल्या 24 तासांत काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद

point

पुढचे तीन दिवस राज्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज

point

मुंबई आणि पुण्यात पावसाची स्थिती काय?

Mumbai Weather Forecast Today : महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पण राज्यातील बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस कोसळत आहे. आता जरी राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी 17 ऑगस्टपासून पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत गेल्या 24 तासांत काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे. तर, इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती कशी असणार? याविषयी सविस्तर जाणून घेऊया. (maharashtra mumbai pune weather live update news today 14 august 2024 Know the rainfall status of your state)

ADVERTISEMENT

पुढचे तीन दिवस राज्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा : Baramati Vidhan Sabha: अजित पवारांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला!

मुंबई आणि पुण्यात पावसाची स्थिती काय?

मुंबई आणि पुण्यात आज हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. याशिवाय राज्यातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील पावसाचा जोर कमीच राहील. यानंतर 17 ऑगस्टपासून राज्यातील पाऊस पुन्हा कोसळधार होण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana: 'तुमची 'लाडकी बहीण' योजना थांबवू...', सुप्रीम कोर्ट शिंदे सरकारवर एवढं का संतापलं!

मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. तर, पुण्यातील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 दिवस पावसाची विश्रांती असणार आहे.

 

ADVERTISEMENT


 

ADVERTISEMENT


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT