Maharashtra Weather Forecast : 4 दिवस धोक्याचे! मुंबई, पुण्यासह 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसह महाराष्ट्रातील हवामान अंदाज काय?
महाराष्ट्र, मुंबई, पुणे हवामान अंदाज काय?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र हवामान अंदाज १३ जुलै

point

मुंबई, पुणे, ठाणे जिल्ह्यात कसा असेल पाऊस?

point

भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?

Weather Forecast Maharashtra : गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर कायम असून, पुढील तीन-चार दिवसात जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, ऑरेंज अलर्टही जारी केला आहे. (The IMD has warned nine districts of Maharashtra, including Mumbai, Pune, Thane, Palghar, of heavy rain)

ADVERTISEMENT

पश्चिम घाटालगत असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून, काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसतील, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 

Maharashtra Weather 13 July : महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

शनिवारी (13 जुलै) महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत पावसाचा जोर वाढेल.

हे वाचलं का?

हेही वाचा >> "जे आमदार फुटले त्यांची नावे आज...", जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टने खळबळ 

हवामान विभागाने मुंबई, मुंबई उपनगरे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा >> महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार? भाजपची झोप उडवणारा सर्व्हे 

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली,भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. 

ADVERTISEMENT

Mumbai Weather, 14 July : मुंबईत कसा असेल पाऊस?

14 जुलै रोजी मुंबई मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुण्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

ADVERTISEMENT

Maharashtra weather Latest News : 13 july, 14 july, 15 july IMD Predications
Maharashtra Weather Updates : पुढील तीन दिवस कसे असेल महाराष्ट्रातील हवामान, पहा नकाशा.

15 जुलै रोजी मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असून, ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील इतर भागातही पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे. आयएमडीने इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT