Vidhan Parishad election : "जे आमदार फुटले त्यांची नावे आज...", जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टने खळबळ
Maharashtra Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला जबर धक्का दिला. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसच्या आमदारांनी पक्षालाच दगा दिल्याने खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

विधान परिषद निवडणूक निकाल २०२४

जितेंद्र आव्हाड यांची विधान परिषद निवडणूक निकालानंतर पोस्ट

महायुती सरकारने आमदारांना पाच कोटींची ऑफर दिल्याचा गंभीर आरोप
Maharashtra mlc election : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या काँग्रेसला विधान परिषद निवडणुकीत मोठा हादरा बसला. काँग्रेसची मतेच फुटल्याने महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार पराभूत झाला. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला आहे. प्रत्येक आमदाराला पाच कोटी आणि १०० कोटींची विकासकामे अशी ऑफर देण्यात आली होती, असा दावा आव्हाडांनी केला आहे. (NCP SP MLA Jitendra Awhad has made a serious claim that the Mahayuti government had offered Rs 5 crore to each MLA of Opposition parties)
"पाच कोटी रूपये आणि 100 कोटींची विकासकामे हा दर ठरला होता. तुम्ही हे देऊन आमदारांना विकत घेऊ शकता; पण जनतेला घेऊ शकत नाहीत", असे जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीला म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाडांनी विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. 'गद्दारांना महाराष्ट्र धडा शिकवेल', असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी फुटलेल्या आमदारांबद्दल संताप व्यक्त केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट वाचा जशीच्या तशी....
"आज विधान परिषदेच्या निवडणुकीत जी काही मते फुटली किंवा फोडण्यात आली, त्याचे एकमेव कारण म्हणजे पैसा आणि विकासनिधी. म्हणजे जनतेच्याच पैशाचा खेळ!"