कोकणासह 'या' भागांना पावसाचा येलो अलर्ट जारी, पुणे आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी असेल?

मुंबई तक

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील हवामानाचा १ जुलै रोजी हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD)ने नैऋत्य मान्सूनच्या सक्रिय कालावधीचा भाग आहे, असा अंदाज वर्तवला.

ADVERTISEMENT

Maharashtra weather Update
Maharashtra weather Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हवामान विभागाने १ जुलै रोजी हवामानाची शक्यता वर्तवली

point

जुलैमध्ये पावसाचे प्रमाण अधिक

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील हवामान विभागाने १ जुलै रोजी हवामानाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने नैऋत्य मान्सूनच्या सक्रिय कालावधीचा अंदाज वर्तवला. दरवर्षीप्रमाणेच जूनमध्ये पाऊस हलक्या स्वरुपाचा असतो. तर जुलैमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असतो. 

हेही वाचा : ताट, लाटणं, उलाथणं घेऊन बदडलं, तरूणाला घेरून चोपलं...हॉटेल भाग्यश्रीवर पुन्हा काय राडा?

कोकण मान्सून परिस्थिती 

1 जुलै रोजी मान्सूनची स्थिती पाहता, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये 50 ते 100 मिमी पावसाचा अंदाज असणार आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात 100 ते 150 मिमी पावसाचा अंदाज आहे. यामध्ये मुंबई, रायगड आणि रत्नागिरीसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

पुणे आणि मध्य महाराष्ट्र 

पुणे आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील, विशेष म्हणजे सातारा आणि कोल्हापूरात 40 ते 120  मिमी पावसाची शक्यता असणार आहे. तसेच हवामान विभागाने ढगाळ आणि गडगडाटासह पावसाची शक्यता जारी केली आहे. कोल्हापूर आणि सांगलीसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मराठवाडा 

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर आणि धाराशिवमध्ये हलका ते मध्यम पाऊस असेल. तर काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिवमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

विदर्भ

विदर्भात 1 जुलैपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 28- 29 जूनपासून पावसाच्या स्थितीत सुधारणा होणार आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. 

मुंबई आणि पुणे पावसाची स्थिती

हेही वाचा : 'बहिणीचा नवरा माझ्या बायकोसोबत...', लग्नाच्या 7 दिवसानंतरच पत्नीने केला भलताच खेळ!

मुंबई आणि पुणे शहरी भागांमध्ये पावसामुळे हवेची गुणवत्ता मध्यम ते समाधानकारक राहील. ग्रामीण भागात हवेची गुणवत्ता चांगली असेल. 
 
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पूर आणि भूस्खलनाच्या शेतकऱ्यांनी पूर शक्यतेमुळे सावधगिरी बाळगावी. 

हे वाचलं का?

    follow whatsapp