पतीपासून लपून लपून खायची गुटखा.. पतीने पकडलं पण पत्नीने केला मोठा कांड

मुंबई तक

Husband And Wife Clash Viral News :  गुटखा खाणं आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. पण हे खाल्ल्यानं घरगुती वाद होत असतील, तर एखाद्याचं आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकतं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पती-पत्नीत गुटखा खाण्यावरून झाला मोठा वाद

point

पतीने पत्नीला गुटखा खाताना पाहिलं..नंतर घडलं भयंकर!

point

पत्नीने उचललं टोकाचं पाऊल..

Husband And Wife Clash Viral News :  गुटखा खाणं आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. पण हे खाल्ल्यानं घरगुती वाद होत असतील, तर एखाद्याचं आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकतं. अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना उत्तरप्रदेशच्या बांदा येथे घडली आहे. येथील एका महिलेला गुटखा खाण्याची सवय लागली होती. या महिलेनं तिचं हे सीक्रेट पतीला सांगितलं नव्हतं.

पतीने एक दिवस पत्नीला गुटखा खात असताना पाहिलं. त्यानंतर पतीने पत्नीला सुनावलं. आजपासून गुटखा खाऊ नको, असं पती पत्नीला म्हणाला. पण पत्नीने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर एक दिवस पतीने त्याच्या पत्नीला गुटखा खाताना पकडलं, नंतर दोघांमध्ये खूप वादविवाद झाले. पती पत्नीवर ओरडल्याने ती दु:खी झाली आणि तिने गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. 

पतीने पत्नीला गुटखा खाताना पाहिलं..नंतर घडलं भयंकर!

मिळालेल्या माहितीनुसार, जमुनीपुरवा गावात राहणाऱ्या 28 वर्षीय शिवदेवीने साडीने गळफास घेऊन जीवन संपवलं. काही वेळानंतर पती सम्राट घरी पोहोचला. त्यानंतर पत्नीला पाहून त्याला मोठा धक्का बसला. त्यानंतर त्याची वहिनी रामादेवी आणि शिवदेवीची मोठी बहिण रुममध्ये पोहोचली. त्यानंतर महिलेला खाली उतरवण्यात आलं. रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच या महिलेचा मृत्यू झाला. 

हे ही वाचा >> 'जय गुजरात', पुण्यात अमित शाहांसमोर एकनाथ शिंदे यांची घोषणा!

अनेक वेळा पत्नीला मनाई केली होती..

या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.  पोलिसांनी मृतदेह ताब्यात ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला. मृत महिलेचा पती सम्राटने म्हटलं, तो दिल्लीत मजुरी करतो. एक महिन्याआधीच तो बहिणीच्या विदाई पूजा कार्यक्रमात गेला होता. त्याने पत्नीला अनेकदा गुटखा खाताना पाहिलं होतं आणि तिला सुनावलं होतं. तेव्हा त्याला पत्नीकडे एक पॅकेट गुटखा मिळालं. पत्नीला ओरडल्यानंतर तो दुसऱ्या व्यक्तीला भेटायला गेला होता. काही वेळानंतर पती सम्राट घरी पोहोचला आणि त्याला धक्काच बसला. कारण शिवदेवीने गळफास घेऊन जीवन संपवलं होतं. 

हे ही वाचा >> मुंबईची खबर: भुयारी बोगद्याच्या बांधणीला गती... वन खात्याची "इतकी" जागा पालिकेला मिळणार!

हे वाचलं का?

    follow whatsapp