Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तरूणाचं विष प्राशन, उमरखेडमध्ये आंदोलन चिघळलं
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेडमध्ये गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनात जवेलीतला तरूण अशोक जाधव देखील उपोषणाच्या समर्थनार्थ उमरखेडमध्ये दाखल झाला होता. आंदोलन सुरू असताना अशोक जाधव मंडपाच्या मागे गेला आणि त्याने विष प्राशन केले.
ADVERTISEMENT
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) अखेर 15 व्या दिवशी त्यांचे उपोषण मागे घेतले आहे. सरकारसमोर 5 अटी ठेवून मनोज जरांगे पाटलांनी उपोषण तुर्तास स्थगिती दिली आहे. असे असतानाच राज्यातील इतर भागात मात्र मराठा समाजाचे आंदोलन सुरुच आहे. अशाच एका मराठा आंदोलनात असणाऱ्या एका तरूणाने विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशोक देवराव जाधव असे या मराठा आंदोलक तरूणाचे नाव आहे. मराठा आरक्षणासाठी त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. आता या तरूणाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे.(maratha boy took poisoned maharashtra reservation manoj jarange patil agitation umarkhed yavatmal)
ADVERTISEMENT
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेडमध्ये गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणात खेड्या पाड्यातील नागरीक मोठ्या प्रमाणात सामील झाले होते. या आंदोलनात जवेलीतला तरूण अशोक जाधव देखील उपोषणाच्या समर्थनार्थ उमरखेडमध्ये दाखल झाला होता. आंदोलन सुरू असताना अशोक जाधव मंडपाच्या मागे गेला आणि त्याने विष प्राशन केले. ही बाब इतक नागरीकांच्या लक्षात येताच त्याला लगेच रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अशोक जाधवच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
हे ही वाचा : Neha Shourie : 100 कोटीचा घोटाळा उघड करणाऱ्या ड्रग इन्स्पेक्टरच्या मर्डरची Inside Story
दरम्यान याआधी 7 सप्टेंबरला धाराशीवमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठा आऱक्षणासाठी एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. उमरगा तालुक्यातील माडज गावात राहणाऱ्या चंद्रकांत माने या तरूणाने तळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपुर्वी तरुणाने मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे असे म्हणत तलावात उडी मारून जीवनयात्रा संपवली आहे. या आत्महत्येने मराठा समाजावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हे वाचलं का?
दरम्यान चंद्रकांत माने यांच्या आत्महत्येनंतर आता स्थानिक मराठा समाज आक्रमक झाला आहे. सकल मराठा समाजाने या प्रकरणाने आक्रमक पावित्रा घेत उमरगा उपविभाग अधिकारी कार्यालयासमोर चारचाकी गाड्या पेटवल्या आहेत. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.
हे ही वाचा : Nagpur: भयंकरच घडलं! नागपुरात तरुणाने फेसबुक लाईव्ह करून आयुष्य संपवलं, कारण…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT