काका-मामाची होती वाईट नजर! महकने शेजारच्या मुलालाच पटवलं..राहत्या घरी महकसोबत काय-काय घडायचं?
Shocking Viral love Story : उत्तराखंड आणि बरेलीशी संपर्क असणाऱ्या महकने स्वप्नातही विचार केला नसेल की, तिला असा निर्णय घ्यावा लागेल. महकचं बरेलीच्या ऋषीसोबत प्रेम जडलं. पण..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

त्या तरुणीने स्वप्नातही विचार केला नसेल...असं काही घडेल!

काका आणि मामाच्या घरी महकसोबत काय घडलं?

महकने कुटुंबियांना दिला जोरदार धक्का आणि...
Shocking Viral love Story : उत्तराखंड आणि बरेलीशी संपर्क असणाऱ्या महकने स्वप्नातही विचार केला नसेल की, तिला असा निर्णय घ्यावा लागेल. महकचं बरेलीच्या ऋषीसोबत प्रेम जडलं. पण स्वत:च्याच घरात तिच्यासोबत असं काही घडलं, ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. महकचे वडील वसीम अहमद यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिचं संपूर्ण आयुष्य बदललं. तिची आई शबानाने दुसरं लग्न केलं. त्यानंतर जे काही घडलं ते वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
त्यामुळे ती चुलत काकांकडे राहायला गेली. पण काकांची तिच्यावर वाईट नजर होती. त्यामुळे ती मामाच्या घरी राहायला आली. तिला वाटलं की ती इथे सुरक्षित राहील आणि ती भविष्याबाबत विचार करू शकेल. पण तिथेही मामाने तिच्यावर वाईट नजर ठेवली. त्यानंतर महकने तीचं जुनं आयुष्य बदललं. म्हणजेच हिंदू बनून प्रियकर ऋषी सोबत लग्न केलं.
हे ही वाचा >> अल्पवयीन मुलगी बॉयफ्रेंडसोबत हॉटेलच्या रुममध्ये गेली, आतून आला जोरदार आवाज अन्...
...म्हणून ऋषीसोबत महकचं जडलं प्रेम
महक तिच्या मामाकडे राहायला गेली होती. पण मामाचीही तिच्यावर वाईट नजर होती. यामुळे महक पुतरी घाबरली होती. महक म्हणते, मामाही तिच्याकडे वाईट नजरेने पाहतो. तीन वर्षांपूर्वी महक तिच्या काकांसोबत बरेलीमध्ये राहत होती. तिच्या घराजवळच ऋषी राहत होता. दोघांमध्ये मैत्री झाली अन् मौत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. महकसोबत जे काही घडायचं ते ती ऋषीला सांगायची. मामाने तिच्यावर वाईट नजर ठेवल्याने तिने त्यांच्यासोबतचे नातेसंबंध तोडले. त्यानंतर बरेलीत येऊत ऋषीसोबत लग्न केलं.
हे ही वाचा >> अश्लील Video व्हायरल झाल्यानंतर गर्लफ्रेंडने दिला बॉयफ्रेंडला दणका! पोलीस स्टेशनमध्ये पत्नीलाच..
बरेलीत हिंदू बनून केलं लग्न
महक आणि ऋषीने बरेलीत लग्न केलं. हिंदू धर्म स्वीकारून महकने ऋषीसोबत लग्नगाठ बांधली. ऋषीसोबत लग्न केल्यानंतर महकने म्हटलं, तिला नेहमी 4 लग्न आणि 3 तलाकच्या परंपरेमुळं भीती वाटायची. मला हिंदू धर्मात सन्मान, सुरक्षा आणि आपलेपण मिळालं आहे. म्हणूनच मी लग्न केलं आहे आणि धर्मांतर केलं.