Maharashtra Weather: कोकणासह 'या' भागात मान्सून घालणार धुमाकूळ, हवामान विभागाचा 'या' ठिकाणी हाय अलर्ट जारी

मुंबई तक

Maharashtra Weather Update : राज्यातील कोकण भागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 4 जून रोजी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील कोकण भागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

point

हवामान विभागाचा 'या' भागांना हाय अलर्ट जारी

Maharashtra Weather Update : राज्यात मान्सून दाखल होऊन काही दिवस झाले आहेत. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसून येत आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यातील कोकण भागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 4 जून रोजी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 

हेही वाचा : ब्रायफ्रेंडला आला 'तो' संशय अन् गर्लंफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्टवर वार, तब्बल 36 वेळा स्क्रू-ड्रायव्हरने...

मान्सूनची स्थिती कशी असेल?

राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागात हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ज्यात कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा  पाऊस राहणार आहे. तर सिंधुदुर्गात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. तर मुंबईचा विचार केल्यास मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. तसेच समुद्रकिनारी भरती-ओहोटीची परिस्थिती लक्षात घेऊन सतर्क रहावे. समुद्रात 3 - 4 मीटर उंचीच्या लाटा उसळतील. 

कोकणानंतर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरात हलका ते मध्यम स्वरुपाचा मान्सून हजेरी लावणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. यापैकी घाटमाथ्यावरील भागात म्हणजेच पुणे, सातारा आणि कोल्हापूरात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार आहे. 

मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी हलका किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. बहुतांश भागात वातावरण हे ढगाळ राहणार आहे. मराठवाड्यानंतर आता विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरात पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये रिमझिम पावसाची शक्यता आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp