Govt Job: पदवीधर अन् इंजिनीयरिंगच्या उमेदवारांसाठी मोठी भरती; लाखोंच्या पगाराची नोकरी...
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) कडून कंपनीच्या जूनियर एक्झिक्युटिव्ह आणि एसोसिएट एक्झिक्युटिव्ह सारख्या बऱ्याच पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जाणून घ्या, पात्रता आणि अर्जाची प्रक्रिया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
BPCL कडून मोठ्या पदांसाठी भरती जाहीर
पदवीधर आणि इंजिनीयरिंगच्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
काय आहे पात्रता आणि अर्जाची संपूर्ण प्रक्रिया?
BPCL Recruitment: जास्त पगार, भत्ते आणि नोकरीच्या सुरक्षिततेमुळे बरेच तरुण सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असतात. अशा उमेदवारांसाठी एका नव्या आणि मोठ्या भरतीची जाहिरात जाहीर झाली असल्याची बातमी समोर आली आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) कडून कंपनीच्या जूनियर एक्झिक्युटिव्ह आणि एसोसिएट एक्झिक्युटिव्ह सारख्या बऱ्याच पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेतलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी इच्छुक उमेदवार bharatpetroleum.in या BPCL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
पदांसाठी शैक्षणिक पात्रता
जूनियर एक्झिक्युटिव्ह (इंजीनियरिंग): मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इंस्ट्रूमेन्टेशन, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल किंवा केमिकल इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
असोसिएट एक्झिक्युटिव्ह (इंजीनियरिंग): B.Tech, BE किंवा BSc (इंजीनियरिंग) करणारे उमेदवार या पदासाठी पात्र असतील.
जूनियर एक्झिक्युटिव्ह (अकाउंट्स): या पदासाठी उमेदवारांनी ग्रॅज्यूएशन सोबत इंटर इंटर CA किंवा इंटर CMA करणं आवश्यक आहे.










