पुरुषांचा स्पर्म काऊंट कमी झालाय? टेन्शन नॉट तरीही व्हाल बाबा, शास्त्रज्ञांनी केलं संशोधन

मुंबई तक

Health News : जगभरात मोठ्या संख्येने पुरुषांना वंध्यत्वाचा सामना करावा लागतोय. यामुळे महिलांना गर्भधारणेच्या सुखापासून लांब रहावं लागतं. पण विज्ञानामुळे ते शक्य होणार आहे. अनेकदा पुरूषांमध्ये शुक्राणूंची कमतरता निर्माण झाल्याने त्यांनाही वडील होण्यापासून वंचित रहावं लागतं. पण आता त्यांना वडील होण्यापासून कोणीही रोखणार नाही. 

ADVERTISEMENT

Health News Men's sperm count dropped and men faced infertility
Health News Men's sperm count dropped and men faced infertility
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जगभरात मोठ्या संख्येने पुरुषांना वंध्यत्वाचा सामना करावा लागतो

point

वैज्ञानिकांनी स्पर्म काऊंटवर मोठं संशोधन केलंय

point

याची माहिती जाणून घ्या...

Health news : जगभरात मोठ्या संख्येने पुरुषांना वंध्यत्वाचा सामना करावा लागतोय. यामुळे महिलांना गर्भधारणेच्या सुखापासून लांब रहावं लागतं. पण विज्ञानामुळे ते शक्य होणार आहे. अनेकदा पुरूषांमध्ये शुक्राणूंची कमतरता निर्माण झाल्याने त्यांनाही वडील होण्यापासून वंचित रहावं लागतं. पण आता त्यांना वडील होण्यापासून कोणीही रोखणार नाही. 

हेही वाचा : माणूस म्हणायचा की सैतान? दीराने वहिणीची केली हत्या, मुंडकं हातात धरून रस्त्यावर फिरत होता

चीनच्या काही शास्त्रज्ञांनी ही परिस्थिती लक्षात घेतली आणि यावर संशोधन केलं. प्रयोगशाळेत स्टेम सेल्सद्वारे शुक्राणू तयार करण्यात आले आहेत. या शुक्राणूंची चाचणी फक्त उंदरांच्या जामातीवरती करण्यात आली आहे. या प्रयोगानंतर उंदरांच्या पिल्लांनी जन्म घेतला आहे. 

चिनी शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत स्टेम सेल्स वापरुन हे शुक्राणू तयार केले आहेत. सध्या उंदरांवर प्रयोग करुन चाचणी केली जाते. यासाठी स्टेम सेल्सचा वापर केला जातो. या पेशींचे इतर पेशींमध्ये रुपांतर करता येईल. यानंतर उंदरांना निरोगी पिल्ले जन्माला आली आहेत.हेच संशोधन मानव जातीच्याबाबतीत करता येईल.  

संशोधनाचे महत्त्व काय आहे फायदेशीर? 

संशोधनाला या जगात अनन्यसाधारण महत्व आहे. प्रयोग करुनच संशोधनाची निर्मिती केली जाते. जर उंदरावर हे प्रयोग करुन संशोधनाला यश मिळाल्यानंतर आता मानव जातीवर हे संशोधन करुन पुरूषांच्या व्यंधत्वावर मात करता येईल. यामुळे वैवाहिक जोडप्यांना लहान बाळ जन्माला घालता येणार आहे. मात्र, अजूनही ते शक्य झालेलं नाही. 

हेही वाचा :  गुरू आणि शुक्र एकत्र आल्याने 'या' राशीच्या लोकांचे खिसे नेहमीच भरलेले राहतील

दरम्यान, वैज्ञानिकांनी केलेल्या या संशोधनाची जगभर चर्चा होताना दिसते. केवळ उंदरावरतीच वैज्ञानिकांनी प्रयोग केला. पुरूषांच्या या समस्यांबाबतीत वैज्ञानिकांनी विचार करणं गरजेचं आहे. दरम्यान, या वैज्ञानिक संशोधनात उंदराला पिल्ले होतील ही माहिती समोर आली. मात्र, साईड इफेक्टबाबत कोणतीही माहिती अद्यापही समोर आलेली नाही. 


हे वाचलं का?

    follow whatsapp