अल्पवयीन मुलगी बॉयफ्रेंडसोबत हॉटेलच्या रुममध्ये गेली, आतून आला जोरदार आवाज अन्...

मुंबई तक

Crime News : पालघर जिल्ह्यात मन सून्न करुन टाकणारी घटना घडली आहे. एका मुलाच्या हातून चुकून ट्रिगर दाबला गेल्याने बंदुकीतून गोळी सुटली आणि थेट मुलीच्या डोक्यात लागली. दरम्यान, मुलगी ही गोळीबार करणाऱ्या मुलाचीच गर्लफ्रेंड होती.

ADVERTISEMENT

crime news Boyfriend accidentally pulls trigger and shoots girlfriend palghar incident
crime news Boyfriend accidentally pulls trigger and shoots girlfriend palghar incident
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पालघर जिल्ह्यात मन सून्न करुन टाकणारी घटना

point

तरुणाने मारलेली गोळी लागली त्याच्याच प्रेयसीला

point

नेमकं काय घडलं?

Crime News : पालघर जिल्ह्यात मन सून्न करुन टाकणारी घटना घडली आहे. एका मुलाने अवैधपणे गोळीबार केला आणि त्या गोळीबारात प्रेयसी जखमी झाली आहे. या घटनेनं अनर्थ घडला आहे. मुलाकडे शस्त्राचा कोणताही परवाना नसताना त्याने गोळीबार केल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तर पीडित तरुणीला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनं पालघरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. दरम्यान, ही घटना एका रिसॉर्टमध्ये घडली होती. 

हेही वाचा : मोठा गेम झाला यार... लॉटरीचे 30 कोटी घेऊन गर्लफ्रेंड पळाली भलत्याच पुरूषासोबत!

18 वर्षांच्या मुलाकडून गोळीबार

पीडित मुलीचे वय वर्षे हे १७ होते. तर तिचा बॉयफ्रेंड हा 18 वर्षांचा होता. त्याने अवैधपणे शस्त्र वापरत गोळीबार केला. याच प्रकरणात पोलिसांनी आता अवैधपणे शस्त्र वापरण्याच्या गुन्ह्यावरून तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी पीडितेला बोईसर येथील एका रुग्णालयातील आयसीयुमध्ये पाठवले आणि तिच्यावर उपचार सुरू करण्याचे रुग्णालय प्रशासनास सांगितले. पीडित मुलीची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी तरुणावर अपहरण आणि खूनाच्या आरोपाअंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

तरुण आणि अल्पवयीन मुलगी राऊत रेसिडेन्सीवर आले होते. आता पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन तपास केला. आणि रेसिडेन्सी संचालकांना धारेवर धरलं आणि त्यांची कानउघडणी केली. मुलगी ही अल्पवयीन असल्याने नियमांच्या पालनावर आपले लक्ष्य असणे गरजेचं होतं. दरम्यान, पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख म्हणाले की, मुलाने अवैधपणे पिस्तूल आणले होते. ती मुलगी त्या पिस्तुलाकडे पाहू लागली होती त्यानंतर अचानकपणे मुलाच्या हातून ट्रिगर दाबला गेला आणि मुलीच्या मानेवर गोळी लागली. 

पोलिसांकडून अवैध बंदूक जप्त

संबंधित प्रकरणाची माहिती आता पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले आणि जखमी मुलीला रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर अल्पवयीन मुलीला बोईसर येथील रुग्णालयात पाठवले. अशावेळी पोलिसांनी अवैध बंदूक जप्त केली. त्यानंतर मुलाला चौकशीसाठी आपल्या ताब्यात घेतलं आणि नंतर त्याला गजाआड टाकलं. पोलिसांनी सांगितलं की, ते त्याला शनिवारी न्यायालयात हजर करतील आणि त्याच्या  कोठडीची मागणी केली जाईल.  

हेही वाचा : आईचे परपुरूषासोबत लिव्ह-इन संबंध, मुलाच्या कृत्याने सगळेच हादरले!

दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेली बंदूक ही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आता पोलीस पुढील तपास करत आहेत. मुलाकडे बंदूक कुठून आली? याचा पोलीस तपास घेत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp