मोठा गेम झाला यार... लॉटरीचे 30 कोटी घेऊन गर्लफ्रेंड पळाली भलत्याच पुरूषासोबत!
Viral Story : बॉयफ्रेंडला ३० कोटींची लॉटरी लागल्यानंतर विश्वासाने गर्लफ्रेंडच्या बँक खात्यात रक्कम जमा केली. त्यानंतर गर्लफ्रेंड रक्कम घेऊन पळून गेली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बॉयफ्रेंडला ३० कोटींची लागली लॉटरी अन् गर्लफ्रेंड पळाली भलत्याच पुरूषासोबत
नेमकं काय घडलं? घ्या जाणून
Viral Story : हल्ली प्रेमाहून पैशाला अधिक किंमत आहे. दैनंदिन जीवनात पैशांशिवाय माणसाचे पान हालत नाही, असे म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. यामुळेच आता पैशांच्या पुढे माणसाची किंमत शून्य झाली आहे. लोक पैशांसाठी अनेक वर्षांचं नातं तोडायला मागे पुढे पाहत नाहीत. मग ते रक्ताचं असो, पती-पत्नीचं असो, प्रियकर- प्रेयसीचं असो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. कॅनडातील विनिपेग शहरात लॉरेन्स कॅम्पबेलने आपल्या प्रेयसीवर लॉटरीचे पैसे घेऊन पळून गेल्याचा आरोप केला आहे. ही रक्कम लाखात नसून करोडात आहे. 30 करोड रुपये लॉटरीची रक्कम घेऊन तिने आपल्या प्रियकराच्या प्रेमाला लाथ मारली आहे.
हेही वाचा : आईचे परपुरूषासोबत लिव्ह-इन संबंध, मुलाच्या कृत्याने सगळेच हादरले!
प्रियसीने लॉरेन्सला दिलेल्या धोक्यामुळे तो आता पुरता हतबल झाला आहे. लॉरेन्स या घडलेल्या प्रकरणाविरोधात मॅनिटोबाच्या कोर्ट ऑफ किंग्ज बेंचमध्ये तरुणीविरोधात खटला दाखल केला. त्याने 2024 मध्ये त्याने एक लॉटरीचे तिकीट खरेदी केलं होतं. त्याच्याकडे वैध ओळखपत्र नसल्याने अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच्या नावाने लॉटरीचे पैसे देऊ असे सांगितलं. अशावेळी त्याने त्याची विश्वासू असणाऱ्या क्रिस्टल अँन मॅकेच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितलं. मात्र, त्यानंतर जे काही झालं ते एकूण तुमचाही प्रेमावरुन विश्वास उडेल.
प्रेयसीच्या बँक खात्यात पैसे आल्यानंतर दोघांनीही काही दिवस चांगले घालवले. मौजमजा केली आणि एकत्र येऊन व्हिडिओत आपले आनंदाचे क्षण कैद करुन ठेवले. पण काही दिवसानंतर क्रिस्टल अचानक हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडली आणि गायब झाली. यानंतर दोघांचाही संपर्क तुटला. यानंतर लॉरेन्सने कोर्टात दावा केला की, मला सर्व सोशल मीडिया आणि कॉल, मेसेजवर तरुणीने ब्लॉक केलं आहे.
पीडित तरुणाने व्यक्त केला संताप










