PM Modi Speech : लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी भारतीयांना काय दिला संदेश?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

pm modi speech today live : in the last days there was a period of violence in Manipur. There was a mess with the honor of mother and daughters, but today the situation is getting normal there. Peace is returning.
pm modi speech today live : in the last days there was a period of violence in Manipur. There was a mess with the honor of mother and daughters, but today the situation is getting normal there. Peace is returning.
social share
google news

PM Modi Speech on Independence Day : देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावर झेंडावदन सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ध्वजारोहण केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘लोकसंख्येच्या बाबतीतही आपण पहिल्या क्रमांकाचा देश आहोत. इतका विशाल देशाचे आपले कुटुंब आज स्वातंत्र्योत्सव साजरा करत आहोत. देशात आणि जगात भारतावर प्रेम करणार्‍या आणि त्यांचा आदर करणार्‍या करोडो लोकांना स्वातंत्र्यादिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो.’

मोदी म्हणाले, ‘परमपूज्य बापूंच्या नेतृत्वाखाली त्याग करणाऱ्या अगणित वीरांना मी नमन करतो. त्या पिढीत क्वचितच कोणी असेल, ज्याने योगदान दिले नसेल. ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले आहे, त्याग केला आहे, त्या सर्वांना मी आदरपूर्वक नमन करतो.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> अजित पवार माघारी फिरणार?, शरद पवारांची खळबळ उडवणारी ‘गुगली’

पीएम मोदी म्हणाले, ‘यावेळी नैसर्गिक आपत्तीने देशाच्या अनेक भागांमध्ये अभूतपूर्व संकट निर्माण केले आहे. याचा सामना करणाऱ्या सर्व कुटुंबांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो.’

मणिपूरच्या जनतेसोबत देश -पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मागील काही दिवस मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला. माता-भगिनींच्या सन्मानासोबत छेडछाड झाली, पण आता परिस्थिती सामान्य होत आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होत आहे. केंद्र आणि राज्य सरकार शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहेत. देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे.’

ADVERTISEMENT

वाचा >> Raj Thackeray and BJP: ‘मला भाजपची ऑफर…’, राज ठाकरेंकडून गौप्यस्फोट; Inside Story

PM नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरील संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा

ADVERTISEMENT

या काळातील निर्णय सुवर्ण इतिहासात लिहिले जातील -मोदी

नरेंद्र मोदी म्हणाले, ‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या सर्व वीरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. पीएम मोदी म्हणाले, या काळातील निर्णय भारताच्या हजार वर्षांच्या सुवर्ण इतिहास लिहिले जातील.’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT