Ajit Pawar Meet Sharad Pawar: अजित पवार माघारी फिरणार?, शरद पवारांची खळबळ उडवणारी ‘गुगली’

मुंबई तक

ADVERTISEMENT

can ajit pawar change his stance and leave bjp sharad pawars sensational statement latest political news maharashtra
can ajit pawar change his stance and leave bjp sharad pawars sensational statement latest political news maharashtra
social share
google news
Ajit Pawar Meet Sharad Pawar: वसंत मोरे, पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची शनिवारी (12 ऑगस्ट) पुण्यात एक गुप्त भेट झाली होती. पण या भेटीचा माध्यमांना सुगावा लागल्याने ही भेट उजेडात आली. ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. तसंच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला. यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टींचा खुलासा देखील केला. मात्र, तरीही त्यांच्याभोवती काहीसं अविश्वासाचं वातावरण तयार झालं. असं असताना आता शरद पवारांनी लागलीच दुसरा ‘गुगली’ टाकला आहे. (can ajit pawar change his stance and leave bjp sharad pawars sensational statement latest political news maharashtra)
अजित पवार हे भाजपसोबत गेले असले तरी ते माघारी येऊ शकतात अशा स्वरुपाचं विधान शरद पवार यांनी केलं आहे. आज (14 ऑगस्ट) पुरंदर तालुक्यातील शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेऊन समर्थन व्यक्त केले.  यावेळी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.

‘लोक वेगळ्या भूमिका घेतात, पण आज ना उद्या परिस्थिती लक्षात आल्यावर…’

‘लोक वेगळ्या भूमिका घेत असतात. आपल्यातील काही सहकाऱ्यांनी वेगळी सध्या भूमिका घेतली आहे. पण आज ना उद्या परिस्थिती लक्षात आल्यावर त्यांच्यात बदलही होऊ शकतो.’ अशी गुगली शरद पवार यांनी टाकली आहे. ‘त्यांनी काहीही भूमिका घेऊ द्या, त्यांच्यात बदल होवो अथवा न होवो आपला जो रस्ता आहे, तो बदलायचा नाही.’ असं म्हणत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहू नये असा प्रयत्ना केला आहे.

हे ही वाचा>> Raj Thackeray and BJP: ‘मला भाजपची ऑफर…’, राज ठाकरेंकडून गौप्यस्फोट; Inside Story

‘आपला विचार, आपली दिशा ही कधी सोडायची नसते..’

शरद पवार म्हणाले, ‘अनेकांनी मला सुप्रिया यांचे संसदेतील भाषण ऐकल्याचे सांगितले. ते म्हणाले, आम्ही त्यांना लांबून बघितले. पण संबंध संसदेत त्यांच्या भाषणाकडे बघण्याचा जो दृष्टीकोन होता तो एकप्रकारे महाराष्ट्रातील भगिनींचे सन्मान करणारा होता. याचे कारण नितीशी त्यांनी तडजोड केली नाही. विचाराने त्या पुढे जात आहेत. आपली भूमिका तत्वाची आहे.’
‘पुरंदरला विधानसभेला आपल्या पक्षाचा उमेदवार नव्हता. आपल्या मित्रपक्षाचा उमेदवार होता. तेथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तुम्ही राष्ट्रवादीचे काम केले. तेथे तुम्ही पक्षाला मत मागितले. घड्याळ ही खूण सांगितली. त्यामुळे लोकांनी तुम्हाला साथ दिली. उद्या तुम्ही हा पक्ष आणि खूण मी सोडली असे सांगितले तर लोकांना या गोष्टी पटत नाहीत. कोणी येत असते, कधी आपले जात असतात. याची चिंता करायची नसते. आपला विचार, आपली दिशा ही कधी सोडायची नसते.’ असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

‘सत्ता येते आणि जाते पण सामान्यांना दिलेला शब्द कधी सोडायचा नसतो’

सत्ता येते आणि जाते पण सामान्यांना दिलेला शब्द कधी सोडायचा नसतो. त्यापासून बाजूला जायचे नसते. लोक मला विचारतात कसे होणार, काय होणार? या सगळ्या स्थितीत मी लोकांना आश्वासित करत आहे. असं म्हणत पवार सातत्याने आपली भूमिका कोणत्याही प्रकारे वेगळी नसल्याचं सांगत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT