Eknath Shinde : साताऱ्याहून परतताच शिंदेंचा ठाकरेंवर ‘वार’! म्हणाले, ‘काही लोक…’

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

cm eknath shinde criticized udhhav thackeray mhada mumbai lottery drawn
cm eknath shinde criticized udhhav thackeray mhada mumbai lottery drawn
social share
google news

म्हाडाच्या (Mhada) मुंबई मंडळाच्या 4 हजार 82 घरांसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav thackeray) टीका केली आहे. काही जण निवडणूक आली की आरडाओरड करतात, असा चिमटाच मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंना काढत, आम्ही असे न करता आवश्यक ते निर्णय घेण्याचे काम करतो, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. (cm eknath shinde criticized udhhav thackeray mhada mumbai lottery drawn)

घर घेण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. प्रत्येक जण यासाठी प्रयत्न करत असतो. त्यास बळ देण्याचे काम म्हाडा करत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. तसेच काही लोकांना वाटत असेल, मंत्री महोदय यांमुळे घर लागत असेल, पण इथे तसे काही चालत नाही, पारदर्शक पणे लॉटरी निघते, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Sharad Pawar Meet Ajit Pawar: ‘सामना’चा अग्रलेख शरद पवारांच्या जिव्हारी, पत्रकारावर संतापले!

मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पामुळे मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेला आहे. या मुंबईकराला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. यासाठी म्हाडा, एमएमआरडीए, सिडको या संस्थांना विभागून काम देत आहोत. या संस्थांच्या माध्यमातून रखडलेला प्रकल्प मार्गी लावण्याचे काम सरकार करणार आहे, आणि मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचे काम सरकार करणार असल्याचे शिंदे म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या पुर्नविकासाकडे लक्ष आहे. ही झोपडपट्टी विकसीत होईल, तेव्हा नागरीकांच्या राहणीमानात बदल होईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणााले आहेत.

हे ही वाचा : Sharad Pawar Ajit Pawar meet : ‘तुम्ही माझं ऐकत नाही’, ‘त्या’ भेटीनंतर राज ठाकरेंचं मोठं भाकित

आज आमच्यावर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. पण आम्ही आमच्या कामाने उत्तर देत आहोत. जेवढे आरोप कराल, त्याच्या दुप्पट काम आम्ही काम करू. आम्ही 24-7 काम करणारे आहोत, असा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांना लगावला आहे. तसेच आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो, तेव्हा लोकांच्या अडचणी कळतात. नालेसफाईचे काम आणि रस्त्याचे काम आम्ही तिथे जाऊन पाहिले असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT