Hatkanangale Lok Sabha : "जयंत पाटलांनी ठाकरेंना सांगितलं की...", शेट्टींचा मोठा गौप्यस्फोट

भागवत हिरेकर

Raju Shetti hatkanangale lok sabha : उद्धव ठाकरेंनी राजू शेट्टींना मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. तो शेट्टींनी नाकारला. पण, या मागे जयंत पाटील होते, असा दावा राजू शेट्टींनी केला आहे. त्यांनी सगळा घटनाक्रम सांगितला.

ADVERTISEMENT

हातकणंगलेच्या जागेबद्दल जयंत पाटलांनी ठाकरेंना सल्ला दिला होता, असा दावा शेट्टींनी केला आहे.
राजू शेट्टींना मशाल चिन्हावर लढण्याचा होता प्रस्ताव.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ निवडणूक

point

राजू शेट्टी यांचा जयंत पाटलांवर गंभीर आरोप

point

ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेबद्दल केला गौप्यस्फोट

Hatkanangale Lok Sabha, Raju Shetti Uddahv Thackeray : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी पाठिंबा देणार अशी चर्चा सुरूवातीला झाली. नंतर मशाल चिन्हावरून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव राजू शेट्टी यांना दिला गेला. पण, शेट्टींनी तो नाकारला. पडद्यामागे नेमकं काय झालं, याबद्दल आता राजू शेट्टी यांनीच मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Raju Shetty claimed that Uddhav Thackeray was advised by Jayant Patil that i should contest elections on Shiv Sena's torch symbol from Hatkanangale Lok Sabha)

राजू शेट्टी यांनी हातकणंगलेच्या जागेबद्दल ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेचा बीबीसी मराठी ला दिलेल्या मुलाखतीत घटनाक्रम सांगितला.

महाविकास आघाडीतून तुम्ही बाहेर पडलात, पण त्यांनी तुम्हाला पाठिंबा द्यावा, ही भूमिका विरोधाभासी वाटत नाही का?, असा प्रश्न राजू शेट्टी यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. 

राजू शेट्टी हातकणंगलेच्या जागेबद्दल काय काय बोलले?

प्रश्नाला उत्तर देताना राजू शेट्टी म्हणाले, "विरोधासच आहे ना. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. मी आघाडीत का येत नाही, तर मी स्पष्ट सांगितलं आहे की, आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. पण, त्यांना त्यांच्यातून फुटून जाणाऱ्या खासदारांचा पराभव करायचा होता. मग त्यांनी उमेदवार उभा करून नये, मतविभागणी टाळावी, असे व्यावहारिक समझोते होतच असतात. व्यावहारिक पातळीवर उमेदवार कमी केला असता तर काही बिघडत नव्हतं."

हे वाचलं का?

    follow whatsapp