बीड : मेडिकलवाला नृत्यांगनेचा डान्स पाहायला धाराशिवला गेला, येताना मित्रांनी दारु पाजून जीव घेतला, मृतदेह दारात टाकला

मुंबई तक

Beed Crime News : साळेगाव येथील बारमध्ये तसेच कळंब आणि येरमाळा परिसरातील धाब्यावर सर्वांनी दारू पिल्याची माहिती आहे. रात्री साडेबारा वाजेपर्यंत ते कला केंद्रात होते. परत येताना मध्यरात्री दुसऱ्या गाडीतून आलेल्या ओळखीच्या काही तरुणांनी त्यांची गाडी अडवली. जुन्या वादाची कुरापत काढत सतीश मुंडे यांना छातीत आणि पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बीड : मेडिकलवाला नृत्यांगणेचा डान्स पाहायला धाराशिवला गेला

point

येताना मित्रांनी दारु पाजून जीव घेतला, मृतदेह दारात टाकला

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील आणखी एका तरुणाचा दारू आणि संगीत बारीच्या नादात बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केज तालुक्यातील साळेगाव येथील औषध विक्रेता सतीश भागवतराव मुंडे (वय 37) यांचा मित्रांनीच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह त्याच गाडीतून घरी आणून टाकण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

सतीश मुंडे हे 12 फेब्रुवारी रोजी मित्रांसोबत धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्रावर नाच-गाणे पाहण्यासाठी गेले होते. शेख अजमोद्दीन ऊर्फ मुन्ना शेख जिलानी यांच्या स्विफ्ट डिझायर कारने ते रवाना झाले. मार्गात साळेगाव येथील बारमध्ये तसेच कळंब आणि येरमाळा परिसरातील धाब्यावर सर्वांनी दारू पिल्याची माहिती आहे. रात्री साडेबारा वाजेपर्यंत ते कला केंद्रात होते. परत येताना मध्यरात्री दुसऱ्या गाडीतून आलेल्या ओळखीच्या काही तरुणांनी त्यांची गाडी अडवली. जुन्या वादाची कुरापत काढत सतीश मुंडे यांना छातीत आणि पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

हेही वाचा : आई गावाला गेली, रात्री घरात बाप अन् मुलगी दोघंच; सकाळी 21 वर्षीय मुलीने मैत्रिणींना सांगितला धक्कादायक प्रकार

मृत्यू झाल्यानंतरही आरोपींनी सतीश यांना त्याच कारमधून रात्री सुमारे 1 वाजता साळेगाव येथील घरी आणले. घरी आल्यावर ते जास्त दारू पिल्याने बेशुद्ध असल्याचे सांगण्यात आले. मात्र वडिलांनी आवाज दिला असता कोणतीही हालचाल झाली नाही. त्यानंतर त्यांना केज उपजिल्हा रुग्णालयात आणि पुढे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सतीश मुंडे यांना मृत घोषित केले.

हे वाचलं का?

    follow whatsapp