मंदिरातून पूजा करुन परतत असताना पुजाऱ्याला संपवले, धारधार शस्त्राने केले 8 वार; गावकऱ्यांना वेगळाच संशय
Murder of Priest : मंदिरातून पूजा करुन परतत असताना एका 75 वर्षीय पुजाऱ्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. इंद्रभान द्विवेदी असं या पुजाऱ्याचं नाव आहे. मध्यप्रदेशातील सीधी जिल्ह्यातील ही घटना आहे. द्विवेदी हे कुसमी तालुक्यातील हनुमान मंदिरात अनेक वर्षांपासून पुजारी आहेत. या हत्येमागे जातीय कारण असल्याचे बोलले जात आहे. सध्या परिसरात तणावाचे वातावरण असून द्विवेदी यांच्या गावातील काही लोक त्वरित न्याय मिळावा या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मंदिरातून पूजा करुन परतत असताना पुजाऱ्याला संपवले, धारधार शस्त्राने केले 8 वार
गावकऱ्यांना वेगळाच संशय
Murder of Priest : मंदिरातून पूजा करुन परतत असताना एका 75 वर्षीय पुजाऱ्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. इंद्रभान द्विवेदी असं या पुजाऱ्याचं नाव आहे. मध्यप्रदेशातील सीधी जिल्ह्यातील ही घटना आहे. द्विवेदी हे कुसमी तालुक्यातील हनुमान मंदिरात अनेक वर्षांपासून पुजारी आहेत. या हत्येमागे जातीय कारण असल्याचे बोलले जात आहे. सध्या परिसरात तणावाचे वातावरण असून द्विवेदी यांच्या गावातील काही लोक त्वरित न्याय मिळावा या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत.
हे ही वाचा : धाराशिवमध्ये मोठा राडा, काँग्रेस अन् ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; ZP निवडणुकीनंतर वाद उफाळला VIDEO
धारधार शस्त्राने आठ वार
पुजारी इंद्रभान द्विवेदी आपल्या दुचाकीवरून जात असताना आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने पाठीमागून हल्ला केला. आरोपीने सुरुवातीला चालत्या दुचाकीवर त्यांच्या मानेवर वार केला. lत्यामुळे ते जमिनीवर कोसळले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारी खाली पडल्यानंतरही हल्लेखोर थांबला नाही. त्याने त्यांच्या छातीवर एकामागून एक सुमारे आठ वार केले. या भीषण हल्ल्यात द्विवेदींचा जागीच मृत्यू झाला.
विशिष्ट समाजाबद्दल मनात आकस
पुजारी इंद्रभान द्विवेदी हे अत्यंत शांत स्वभावाचे होते आणि त्यांचे कोणाशीही वैयक्तिक शत्रूत्व नव्हते, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. याप्रकरणी लाला केवट नावाच्या व्यक्तीवर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. काही स्थानिकांच्या मते, आरोपीच्या मनात विशिष्ट समाजाबद्दल आकस होता आणि त्यातूनच त्याने हे पाऊल उचलले असावे. मात्र, हत्येचे नेमके आणि अधिकृत कारण अद्याप पोलीस तपासात स्पष्ट झालेले नाही.