Jalana Lok sabha Election 2024 : रावसाहेब दानवेंना खोतकर का हवेत?
Raosaheb Danve Arjun Khotkar, Jalana Lok sabha Election 2024 : खरं तर 2019 च्या निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता. त्यावेळी खोतकर यांचे मन वळविताना पदाधिकाऱ्यांना कसरत करावी लागली होती. वरिष्ठ नेतेमडळींनी मध्यस्थी केल्यानंतर खोतकर यांनी माघार घेत निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतली होती.
ADVERTISEMENT
Raosaheb Danve Arjun Khotkar, Jalana Lok sabha Election 2024 :जालना लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचे मनोमिलन झाले आहे. या मनोमिलनानंतर दानवे आणि खोतकरांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. आज पुन्हा दानवे खोतकरांच्या भेटीसाठी दर्शना या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यामुळे निवडणुकीच्या काळात उमेदवार सामान्य नागरीकांचे उंबरठे झिजवत असताना दानवे मात्र खोतकरांचे उंबरठी दिसत आहेत. त्यामुळे रावसाहेब दानवेंना (Raosaheb Danve) अर्जुन खोतकर (arjun khotkar) का हवेत? आणि लोकसभेच्या अनुषंगाने दानवेंना खोतकर किती महत्वाचे आहेत? हे जाणून घेऊयात. (raosaheb danve arjun khotkar dispute overt meet darshana bunglow jalana lok sabha election 2024 congress candidate kalyan kale)
ADVERTISEMENT
खरं तर 2019 च्या निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता. त्यावेळी खोतकर यांचे मन वळविताना पदाधिकाऱ्यांना कसरत करावी लागली होती. वरिष्ठ नेतेमडळींनी मध्यस्थी केल्यानंतर खोतकर यांनी माघार घेत निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतली होती.
हे ही वाचा : "देशद्रोही निकमांनी ही गोष्ट लपवली", वडेट्टीवारांच्या विधानाने मोठा वाद
यंदाच्या निवडणुकीत अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपकडून शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना योग्य तो मानसन्मान मिळत नसल्याने खोतकरांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे दानवेंचा उमेदवारी अर्ज भरणे असो किंवा प्रचाराचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमात खोतकर अनुपस्थितीत होते. पण अखेर शुक्रवारी दानवे यांनी खोतकर यांच्या दर्शना या निवासस्थानी जाऊन त्यांची गळाभेट घेतली आणि अबोला दुर केला होता.
हे वाचलं का?
जालन्यात कुणाची ताकद?
जालन्यात भाजपचे तीन आमदार आहेत. बदनापूरचे नारायण कुचे, भोकरदनचे संतोष दानवे आणि फुलब्रीचे हरिआऊ बागडे, तर शिवसेनेचे सिल्लोडचे अब्दुल सत्तार आणि पैठणचे संदिपान भूमरे असे दोन आमदार आहेत. आणि जालन्याचे काँग्रेसचे कैलाश गौरंट्याल असे एक आमदार आहेत.
असं पाहायला गेलं तर महायुतीच्या पाच आमदारांचा दानवेंना पाठिंबा आहे. पण शिवसेनेला जर भाजपकडून योग्य सन्मान मिळाला नाही तर दानवेंना शिवसेनेच्या दोन आमदारांचा पाठिंबा गमवावा लागेल.त्यामुळे दानवेंसाठी खोतकर महत्वाचे आहेत. दानवेंना तीन आमदारांच्या बळावर लोकसभेत एकतर्फी विजय मिळवता येणार नाही. त्यात वंचितचा उमेदवारही खेळ बिघडवू शकतो. त्यामुळे दानवेंना शिवसेनेच्या दोन आमदारांची गरज भासणार आहे. या आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दानवेंना खोतकर यांच्याशी जुळवून घेणे महत्वाचे आहेत. आणि तसे त्यांनी जुळवून घेतले देखील आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : "जयंत पाटलांनी ठाकरेंना सांगितलं की...", राजू शेट्टींचा मोठा गौप्यस्फोट
काळेंनी दिली होती टफ फाईट
जालन्यातून चार वेळा विद्यमान खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा भापजने लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. यावेळी दानवेंविरूद्ध काँग्रेसचे कल्याण काळे आणि वंचितचे प्रभाकर बाकले निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळातील 2014 आणि 2019 या दोन लोकसभा निवडणूका पाहिल्या असता दानवे या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला होता.
ADVERTISEMENT
मात्र 2009 च्या लोकसभेबद्दल बोलायच झालं तर या निवडणुकीत सध्याचे काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी दानवेंना काँटे की टक्कर दिली होती. दानवेंना या निवडणुकीत 3,50,710 मते पडली होती. तर काळेंना 3,42,228 मते पडली होती. एकूणच 8 हजार मतांनी दानवे विजयी ठरले होती. ही लढत पाहताच काँग्रेसने कल्याण काळेला उमेदवारी दिल्याची चर्चा आहे.
दरम्यान आता जालन्याची लोकसभा रावसाहेब दानवे जिंकतात की काँग्रेसचे कल्याण काळे बाजी मारतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT