भारताच्या आरोग्यसेवा व्यवस्थेत AI च्या वापरामुळे लक्षणीय बदल! टीबीच्या उपचारात नवी क्रांती अन्...

मुंबई तक

सध्याच्या काळात जवळपास प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर केला जात आहे. भारतात आरोग्यसेवा म्हणजेच मेडिकल क्षेत्र विकसित करण्यासाठी एआयचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. रुग्णांचं निदान करण्यासाठी एआय-आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचं पाहायला मिळतं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारताच्या आरोग्यसेवा व्यवस्थेत AI च्या वापरामुळे लक्षणीय बदल!

point

टीबीच्या उपचारात नवी क्रांती अन्...

Health Care: सध्याच्या काळात जवळपास प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर केला जात आहे. भारतात आरोग्यसेवा म्हणजेच मेडिकल क्षेत्र विकसित करण्यासाठी एआयचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. रुग्णांचं निदान करण्यासाठी एआय-आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचं पाहायला मिळतं. सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांमध्ये टेलिमेडिसिन आणि सर्व्हिलांस टूल्सचा देखील समावेश केला जात आहे, यामुळे रुग्णांचं लवकर निदान आणि आजारावर उपचार करण्यास मदत होते. क्षयरोग म्हणजे टीबीसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी AI देखील फायदेशीर ठरत आहे. 

टेलिमेडिसिनचा वापर 

याव्यतिरिक्त, टेलिमेडिसिनचा वापर वाढत असल्यामुळे रुग्णांना घरबसल्या आरामात डॉक्टरांशी बोलता येतं. हा उपक्रम विकसित भारत 2047 च्या दृष्टिकोनाकडे एक महत्त्वाचं पाऊल आहे, जिथे सार्वत्रिक आरोग्य कव्हर प्रदान करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मार्च 2024 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने इंडिया AI मिशनला मंजुरी दिली. त्याचे बजेट 10,371.92 कोटी रुपये आहे. AI द्वारे आरोग्यसेवा क्षेत्रात रुग्णसेवेला प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना आरोग्यसेवा प्रदान करणे आणि कम्यूनिटी लेव्हलवरील आजारांवर नियंत्रण ठेवणं, हे त्याचं उद्दिष्ट आहे. 

हे ही वाचा: मुंबई उच्च न्यायालयाने स्मृती मानधनाच्या मित्राला झापलं, पलाश मुच्छलबाबत मानहानीकारक वक्तव्य करण्यास सक्त मनाई

गंभीर टीबीच्या प्रकरणांमध्ये 27 टक्के घट   

आरोग्य मंत्रालयाने अनेक राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये AI चा समावेश केला आहे. क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी एआय-आधारित साधनांचा वापर देखील करण्यात आला. याचा मोठा फायदा म्हणजे, गंभीर टीबीच्या प्रकरणांमध्ये 27 टक्के घट झाली. त्याचप्रमाणे, एप्रिल 2023 ते नोव्हेंबर 2025 दरम्यान ई-संजीवनी प्लॅटफॉर्मद्वारे 282 मिलियन टेलिमेडिसिन सल्लामसलत करण्यात आल्या, ज्यामुळे देशभरातील जवळपास 1.2 कोटी रुग्णांना याची मदत झाली. यामुळे रुग्णांना वैद्यकीय सल्ल्यासाठी रुग्णालयात जाण्याची गरज कमी झाली आणि त्यांना त्यांच्या घरीच डॉक्टरांचा सल्ला घेता येत आहे. 

हे ही वाचा: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? त्यांनी पळ का काढला'; संजय राऊतांनी ट्वीट केला व्हिडीओ

आयुष्मान भारत डिजिटल मिशनसाठी देखील AI चा वापर करण्यात आला. 2018 मध्ये, नीती आयोगाच्या एआयसाठीच्या राष्ट्रीय धोरणात एआय, रोबोटिक्स आणि इंटरनेट ऑफ मेडिकल थिंग्ज हे आरोग्यसेवेतील नवीन नर्व्हस सिस्टिम म्हणून ओळखले जातात. शिवाय, ऑक्टोबर 2024 मध्ये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) आणि आयआयटी कानपूर यांच्यात एक करार सुद्धा झाला होता. उपचारांपासून ते निदानापर्यंत, AI चा वापर ICMR च्या नैतिक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केला जात आहे. याचा फायदा असा आहे की रुग्णांचा डेटा सुरक्षित राहतो आणि त्यांचे आजार गोपनीय राहतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp